शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

सहाव्या उमेदवारामुळे आघाडीमध्ये अस्वस्थता

By admin | Updated: June 2, 2016 02:29 IST

विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे पाच आमदार आरामात निवडून येत असताना भाजपाने पाचऐवजी सहा उमेदवार उभे केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतांवर तर त्यांचा डोळा नाही

यदु जोशी,  मुंबईविधान परिषद निवडणुकीत भाजपाचे पाच आमदार आरामात निवडून येत असताना भाजपाने पाचऐवजी सहा उमेदवार उभे केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतांवर तर त्यांचा डोळा नाही ना, या चर्चेला उधाण आले आहे. आधी ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या मूडमध्ये असलेल्या मुख्यमंत्र्यांनी भाजपाचा सहावा अधिकृत उमेदवार देत काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन प्रमुख विरोधी पक्षांना गोंधळात टाकले आहे. मतदान गुप्त असल्याने काही धोका तर होणार नाही ना या शंकेने आता मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, राष्ट्रवादीमध्ये रामराजे निंबाळकर आणि धनंजय मुंडे यांना उमेदवारी दिल्याने आतल्या आत नाराज असलेल्यांना चाचपण्याचे काम भाजपाने सुरू केले आहे. छोटे साहेब, मोठे साहेब यांच्या समर्थकांमधील हे अंतर्गत राजकारणाचे पदर उलगडून पाहिले जात आहेत. मुंबईतील एक वजनदार मंत्री आणि पुण्यातील एका नेत्याला भाजपाने चाचपणीसाठी कामाला लावले आहे. काँग्रेसने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना उमेदवारी दिली आहे. राणे उद्या विधिमंडळात आले तर ते वरचढ होतील या भीतीने त्यांचा प्रवेश रोखण्याची सुप्त इच्छा असलेल्या काँग्रेसमधील काही आमदारांना भाजपाकडून गोंजारले जात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शुक्रवारच्या शेवटच्या क्षणापर्यंत चाचपणी करून काँग्रेस-राष्ट्रवादीची काही मते गळाला लागतात का याचा प्रयत्न केला जाणार आहे. तो सफल होत असल्याचे दिसले आणि अपक्ष व लहान पक्षांची मते मिळणार असे दिसले तर भाजपा आपले सहाही उमेदवार कायम ठेवेल. अन्यथा, एकाचा उमेदवारी अर्ज मागे घेतला जाईल. भाजपाचा सहावा उमेदवार कायम राहिला तर राष्ट्रवादी वा काँग्रेसची पंचाईत होऊ शकते. विधान परिषदेचे उपसभापतीपद भाजपाला देणार असाल तर आमचा सहावा उमेदवार मागे घेऊ, असे दबावतंत्रही भाजपाकडून वापरले जाऊ शकते.मनसेतून भाजपात आलेले आणि मुंबई जिल्हा बँकेतील घोटाळ्याचे आरोप असलेले प्रवीण दरेकर, काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह यांच्या कृपेखाली अनेक वर्षे राहिलेले वादग्रस्त आर.एन. सिंह आणि राष्ट्रवादीतून अलीकडेच भाजपात उडी घेतलेले प्रसाद लाड या तिघांना भाजपाने उमेदवारी दिल्याची तीव्र प्रतिक्रिया आजदेखील पक्षात उमटली.सोशल मीडियावर टीकेचा पूर आला होता. सूत्रांनी सांगितले की, या तिघांच्या उमेदवारीला कडाडून विरोध करणारे आणि तिघांच्या कर्तृत्वाचे ‘वर्णन’ करणाऱ्या एसएमएसचा मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मोबाइलवर अक्षरश: पाऊस पडल्याची माहिती आहे.