मुंबई : घाटकोपर येथील बेस्ट आगारानजीक ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाच्या जागेत आणि टाटा पॉवरच्या वीजतारांखाली गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत झोपड्या उभारण्यात आल्या असून, त्याकडे महापालिका आणि पोलीस हेतुपुरस्सर डोळेझाक करीत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत येथील झोपडीदादांनी राजरोसपणे या झोपड्या उभारल्या आहेत. दिवसागणिक या झोपड्यांत वाढ होऊन महापालिकेचे या जागेवरील प्रकल्प केवळ कागदावरच राहणारल का, असा सवाल विचारण्यात येत आहे. वास्तविक गेल्या सहा सात वर्षांपासून या ठिकाणी झोपडीदादांकडून अनधिकृत बांधकामाचे सत्र सुरू आहे. मात्र स्थानिक रहिवाशांनी वेळोवेळी याबाबत महापालिकेकडे लेखी तक्रारी करूनही राजकीय दबावापोटी त्याची दखल घेतली जात नाही, असा आरोप करण्यात येत आहे.
घाटकोपर येथे अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट
By admin | Updated: May 7, 2014 01:18 IST