शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

अनधिकृत बांधकामाची पालिकेकडून दखल नाही

By admin | Updated: January 21, 2017 02:31 IST

अनधिकृत बांधकामांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी मुंबई महापालिकेची हेल्पलाइन कार्यरत आहे

मुंबई : अनधिकृत बांधकामांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी मुंबई महापालिकेची हेल्पलाइन कार्यरत आहे. पण पालिका अधिकाऱ्यांकडून या तक्रारींची कोणतीही दखल न घेता कशी निकाली काढण्यात येते, याचा अनुभव साकीनाका येथील मालन गिरी ही ७८ वर्षीय वृद्ध महिला घेत आहे. अनधिकृत बांधकामांना थारा दिला जाणार नाही, अशी घोषणा आयुक्त अजय मेहता करीत असले तरी पालिकेच्या एल विभागाअंतर्गत अनेक अनधिकृत बांधकामे धडाक्याने होत आहेत. याचा तपशील अनिल गलगली यांनी माहिती अधिकारांतर्गत मिळवला आहे. मालन गिरी या साकीनाका येथील मोहिली व्हिलेज येथील लक्ष्मीनारायण मंदिर मार्गावरील चाळीत राहतात. त्यांनी येथील जमीनमालक राजकुमार लोयलका यांच्याकडून १९८२ साली जमीन खरेदी केली. तेव्हापासून येथील काही जागा मोकळीच होती. मालन गिरी यांच्या ताब्यातील या मोकळ्या जागेत सल्लाउद्दिन या व्यक्तीने ११ डिसेंबर रोजी सरकारी सुटी असल्याचा फायदा घेत रात्रभरात अनधिकृत बांधकाम केले. त्याबाबत गिरी यांनी पोलीस नियंत्रण कक्ष व पालिकेच्या तक्रार निवारण कक्षात तक्रार दाखल केली. मात्र कोणत्याच यंत्रणेने त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे १३ डिसेंबरपासून मालन गिरी यांनी महापालिका एल विभाग, आयुक्त, महापौर, सभागृह नेते तसेच उपनगर परिमंडळ ५चे उपायुक्त यांच्याकडेही तक्रारी केल्या. मनसे नगरसेवक दिलीप लांडे यांनीही दोन वेळा सहायक आयुक्त ललित कुमार अ‍ेबी यांना या प्रकरणी लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनी प्रभाग क्रमांक १५२मध्ये कार्यरत असलेले अभियंता योगेश तिवरेकर, मुकादम विश्वनाथ पवार यांना त्वरित कारवाई करण्यास सांगितले असता दोन दिवसांत नोटीस पाठवतो, असे सांगून हे अधिकारी महिनाभर गायब झाले. या महिनाभरात सलाउद्दिन याने बांधकाम पूर्ण केले. तरीही पालिका अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीच कारवाई केली नाही. याबाबत मालन गिरी यांनी मुख्यमंत्री तसेच महापालिका आयुक्तांना निवेदन सादर करीत संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)