शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत जाहिरात, होर्डिंग्जविरुद्ध कडक कारवाई

By admin | Updated: April 4, 2017 04:19 IST

आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग्ज आणि पोस्टर्सविरुद्ध कडक कारवाईचे निर्देश दिले

ठाणे : मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग्ज आणि पोस्टर्सविरुद्ध कडक कारवाईचे निर्देश दिले असून त्यावर संनियंत्रण ठेवण्यासाठी त्यात्या परिमंडळ उपायुक्तांची नोडल आणि संनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. आयुक्तांनी पूर्वी नोडल आॅफिसर म्हणून जे सहायक आयुक्त होते, त्यामध्ये बदल करून आता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उपायुक्त यांची नोडल आणि संनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. अर्थात, अधिनियमातील आणि नियमातील तरतुदींचा भंग करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची जबाबदारी मात्र त्या प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांची असणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, यापुढे घोषणा फलक, जाहिरात, पोस्टर्स, होर्डिंग्जसाठी परवानगी देताना त्यांचा क्रमांक, कालावधी, ठिकाण आदी बाबी ठळकपणे दिसतील, अशा प्रकारे जाहिराती, घोषणा फलक, पोस्टर्सवर छापावे. ज्या जाहिरातींवर या बाबी छापल्या नसतील, ते जाहिरात फलक तत्काळ काढून टाकण्याची कारवाई करावी व त्याचे छायाचित्र संबंधित पोलीस स्टेशनला पाठवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार महापालिका आयुक्तांनी कळवा, मुंब्रा प्रभाग समितीसाठी परिमंडळ-१ चे उपायुक्त यांची नोडल आणि संनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून येथील तक्रारीसाठी ०२२-२५४१०४७०, नौपाडा, कोपरी, रायलादेवी, वागळे प्रभाग समितीसाठी परिमंडळ-२ चे उपायुक्त यांची नियुक्ती केली असून तक्रारींसाठी ०२२-२५४२९६४५, तर लोकमान्यनगर, वर्तकनगर, उथळसर, माजिवडा प्रभागांसाठी परिमंडळ-३ चे उपायुक्त यांची नियुक्ती केली असून तक्रारींसाठी ०२२-२५४४७२२०, ०२२-२५४०२३७५ हे क्रमांक आहेत. (प्रतिनिधी) अनधिकृत जाहिराती, घोषणा फलकांना बंदीनेत्यांचे वाढदिवस किंवा धार्मिक उत्सवांच्या प्रसंगी अनधिकृतपणे लावण्यात येणाऱ्या जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग्ज, पोस्टर्स कार्यक्र म होण्याच्या आधीच काढून टाकावेत. उत्सव काळात मंडप, बुथ यांना परवानगी देताना मंडप परिसरात अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, पोस्टर्स लावण्यात येऊ नये, अशी अट घालण्यात यावी, अशा सूचनाही उच्च न्यायालयाने दिल्या.