शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवसांच्या आठवड्यासाठी अल्टिमेटम

By admin | Updated: July 13, 2016 03:55 IST

पाच दिवसांचा आठवडा करण्याबाबत २५ आॅगस्टपूर्वी राज्य सरकारने निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शासकीय कर्मचारी

मुंबई : पाच दिवसांचा आठवडा करण्याबाबत २५ आॅगस्टपूर्वी राज्य सरकारने निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संघटनांनी दिला आहे. यावर मुख्यमंत्री रशिया दौऱ्याहून परतल्यानंतर मी त्यांच्यासमोर पहिला विषय हाच ठेवेन, असे आश्वासन मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी दिले आहे. अधिकारी/कर्मचारी संघटनांनी सोमवारी एकदिलाने लक्षवेध दिन पाळला. राज्यात अनेक ठिकाणी एकत्र येऊन बैठका घेतल्या आणि पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय तत्काळ घेण्याची आणि अन्य मागण्या केल्या. अधिकारी महासंघ आणि विविध कर्मचारी संघटनांचे नेते क्षत्रिय यांना भेटले. पाच दिवसांच्या आठवड्याला अनुकूलता दर्शविणारा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाने आपल्याकडे पाठविला आहे. आपण त्यावर तत्काळ निर्णय घ्या. आम्ही गेल्या २० महिन्यांत राज्य सरकारबद्दल कुठलीही नकारात्मक भूमिका घेतलेली नाही. तथापि, मुख्यमंत्र्यांनी दीड वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्याप झालेली नाही, अशी नाराजी शिष्टमंडळाने नोंदविली. अधिकाऱ्यांच्या पाल्यांनाही अनुकंपा तत्त्वावर नोकरी द्यावी, निवृत्तीचे वय ६० वर्षे करावे, महिला अधिकारी, दोन वर्षांची बालसंगोपन रजा द्यावी, वेतन आयोग लागू करण्यापूर्वी विद्यमान वेतन त्रुटी दूर कराव्यात, विभागीय संवर्गातून (चक्राकार पद्धत) महिलांना वगळावे, सर्व विभागांतील बदल्या ग्रामविकास विभागाप्रमाणे समुपदेशनाने कराव्यात आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. (विशेष प्रतिनिधी)