शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

माल उल्हासनगरचा, बिल अंबरनाथचे

By admin | Updated: December 8, 2014 02:39 IST

एलबीटी कर चुकविण्यासाठी बिल अंबरनाथचे तर माल उल्हासनगरचा असल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी व्यापाऱ्यांना पाचपट दंड ठोठावण्यात आला आहे.

सदानंद नाईक, उल्हासनगरएलबीटी कर चुकविण्यासाठी बिल अंबरनाथचे तर माल उल्हासनगरचा असल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी व्यापाऱ्यांना पाचपट दंड ठोठावण्यात आला आहे. व्यापाऱ्यांच्या लबाडीमुळे एलबीटीचे उत्पन्न अर्धावर आल्याचा आरोप करत शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी कारवाईची मागणी केली आहे.महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर शनिवारी शहरातील स्वच्छतेची पाहणी करत होते. त्यावेळी कॅम्प क्रमांक-३, परिसरात एका ट्रक मधील माल दुकानात रिकामा केला जात होता. आयुक्तांना संशय आल्याने ट्रक चालकाकडे मालाचे बिल मागितले. तेव्हा चालकाची तारांबळ उडाली. मालाचे बिल अंबरनाथचे असताना तो उल्हासनगरात रिकामा करण्यात येत होता. त्यामुळे आयुक्तांनी दुकानदारावर पाचपट दंडाची कारवाई केली. कबुतर बिल व कच्च्या बिलाच्या चौकशीचे आदेश विभागाला दिले आहेत.शहरातील व्यापाऱ्यांच्या व्यवहारांची २५ टक्केही अधिकृत नोंद होत नाही. त्यामुळे एलबीटीचा भरणा कसा करायचा, असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे. जकात प्रक्रीयेत खरेदी-विक्रीची नोंद ठेवणे बंधनकारक नव्हते. एलबीटी प्रक्रीया प्रणालीत खरेदी-विक्रीची नोंद ठेवून त्यानुसार एलबीटी भरण्याची पध्दत आहे.शहरातील बहुतेक व्यापारी कबुतर व कच्च्या बिलाचा वापर करतात. खरेदी-विक्रीची अधिकृत नोंद ठेवत नाहीत. आता तर व्यापारी दुसऱ्या शहराच्या नावाने मालाचे बिल आणून माल शहरात रिकामा करू लागल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पालिका अधिकारी हैराण झाले आहेत. व्यापाऱ्यांच्या चालुगिरीपणाला आळा घालण्यासाठी धाडसत्र व जकात नाक्यावर मालाच्या गाड्यांची तपासणी करण्याची मागणी राज्य सरकारने केली आहे.