शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे सहभागी, आठवलेंचा बहिष्कार!

By admin | Updated: May 27, 2014 06:22 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाच्या शपथविधीला निमंत्रित केल्यानंतर शिवसेनेने नाराजीचा सूर आळवला होता

नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाच्या शपथविधीला निमंत्रित केल्यानंतर शिवसेनेने नाराजीचा सूर आळवला होता पण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आजच्या शपथविधी समारंभाला सहकुटुंब उपस्थित राहिले. दुसरीकडे मंत्रिपदाची संधी न मिळालेले रिपाइंचे अध्यक्ष खा.रामदास आठवले यांनी मात्र शपथविधी समारंभाला पाठ दाखवत एकप्रकारे नाराजी व्यक्त केली. त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार नाही हे सकाळी आणखीच स्पष्ट झाले होते. तथापि, त्यांचे कुटुंबीय मुंबईहून दुपारी दिल्लीत येणार असल्याने पुन्हा काही घडामोड झाली का अशी चर्चा महाराष्ट्र सदनात सुरू झाली. मात्र, तसे काहीही घडले नाही.आठवले सायंकाळी सहकुटुंब बाहेर फिरायला निघून गेले. ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी आणि मुलगा आदित्य आणि शिवसेनेचे सगळे खासदार समारंभाला हजर होते. उद्धव हे नरेंद्र मोदी यांचे निकटवर्ती अमित शहा यांच्या बाजूला बसले होते. मराठी आणि गुजराती नेते आजूबाजूला बसल्याचे या निमित्ताने बघायला मिळाले.शिवसेनेचे अनंत गीते यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. (विशेष प्रतिनिधी)