शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे महापौर बंगल्याच्या आरोपावर उत्तर देणार ?

By admin | Updated: February 15, 2017 18:23 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी आपल्या पहिल्याच जाहीर सभेत बोलताना शिवसेना- भाजपावर जोरदार शाब्दीक हल्ला चढवला.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 15 - मुलाच्या आजारपणामुळे उशिराने प्रचारात उतरलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी आपल्या पहिल्याच जाहीर सभेत बोलताना शिवसेना- भाजपावर जोरदार शाब्दीक हल्ला चढवला. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरुन शिवसेनेवर गंभीर आरोप केले. 
 
उद्धव ठाकरेंची नजर समुद्रकिनारी वसलेल्या महापौर बंगल्यावर आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या नावाखाली उद्धव ठाकरेंना तो बंगला हडपायचा आहे असा स्पष्ट आरोप त्यांनी केला. महापौर बंगल्याच्या जागी स्मारक आणि महापौरांचा बंगला राणीच्याबागेत. जिथे एकही प्राणी नाहीय. लोक तिथे महापौरांना बघायला येणार अशी टीका राज यांनी केली. शिवसेनेच्या कारभाराचे वाभाडे काढले. आतापर्यंत शिवसेना पक्षप्रमुख प्रत्येक प्रचारसभेमध्ये भाजपावर तुटून पडले पण त्यांनी मनसेविषयी बोलण्याचे टाळले आहे. 
 
आणखी वाचा 
 
मनसेविषयी बोलून त्यांना चर्चेत आणण्यापेक्षा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची रणनिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आखली आहे. पण आता राज ठाकरेंनी शिवसेनेला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे मनसेविषयीची भूमिका बदलून राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांना उत्तर देणार ?, राज यांनी टाळीसाठी केलेल्या फोनवर खुलासा करणार ? असे प्रश्न उपस्थित आहेत. 
 
2009 लोकसभा निवडणुकीच्यावेळी शिवसेनेने असेच मनसेला महत्व न देण्याची रणनितीआखून त्यावेळी आरोपांकडे दुर्लक्ष केले होते. राज मात्र प्रत्येक सभेतून शिवसेनेच्या धोरणाविषयी प्रश्न उपस्थित करत होते. त्यावेळी शिवसेनेला फटका बसला होता. त्यामुळे शिवसेना रणनिती बदलणार का ? त्याचे उत्तर लवकरच मिळेल.