शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाळू कारवाईतील जखमीमुळे उदयनराजे विरुद्ध प्रशासन वाद !

By admin | Updated: June 10, 2016 21:11 IST

वडोली भिकेश्वर, ता. क-हाड येथील वाळू ठेक्यावर महसूल खात्याने केलेली कारवाई वादाच्या भोव-यात सापडली आहे. कारवाईवेळी प्रांताधिका-यांनी अनेकांना मारहाण केल्याचा आरोप खासदार उदयनराजे

- प्रांताधिका-यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी 'क-हाड बंद'ची हाकक-हाड : वडोली भिकेश्वर, ता. क-हाड येथील वाळू ठेक्यावर महसूल खात्याने केलेली कारवाई वादाच्या भोव-यात सापडली आहे. कारवाईवेळी प्रांताधिका-यांनी अनेकांना मारहाण केल्याचा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी केलाय. तसेच प्रांताधिका-यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी त्यांनी शनिवारी 'क-हाड बंद'ची हाकही दिलीय. याउलट 'ही कारवाई कायदेशीर मार्गानेच केली असून निलंबनाच्या कारवाईला मी भीत नाही,' असे प्रांताधिकारी किशोर पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.क-हाड तालुक्यातील वडोली भिकेश्वरमध्ये गुरूवारी महसूल प्रशासनाने कारवाई केली. संबंधित ठिकाणी कृष्णा नदीपात्रातून बोटी व पोकलॅनच्या माध्यमातून वाळू उपसा केला जात होता. कारवाईतून महसुलने वाळूने भरलेले २९ ट्रक, रिकामे ४० ट्रक, ५ पोकलॅन मशिन जप्त केल्या. तसेच वाळू उपशासाठी ठेकेदारांनी ३२ बोटींचा वापर केला होता. त्यापैकी काही बोटीही बाहेर काढून जप्त करण्यात आल्या. एकुण ५२ वाफे या कारवाईत उध्वस्त करण्यात आले. या ठेक्याची व्याप्ती जास्त असल्याने दोन दिवस कारवाईची मोहिम चालेल, असे गुरूवारी रात्री प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र, शुक्रवारी ही कारवाई वादाच्या भोव-यात सापडली. खासदार उदरयनराजे भोसले शुक्रवारी क-हाडमध्ये धडकले. कारवाईवेळी प्रांताधिका-यांनी अनेकांना मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच या मारहाणीत जखमी झालेल्या सचिन पवार या युवकाची त्यांनी कृष्णा रूग्णालयात जाऊन विचारपूस केली. तेथून ते पोलीस उपअधिक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांची भेट घेण्यासाठी गेले. मात्र, उपअधिक्षक शिवणकर कार्यालयात उपस्थित नव्हत्या. त्यानंतर खासदार भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रांताधिका-यांनी कायदा हातात घेत ही कारवाई केल्याचा आरोप करून प्रांताधिका-यांना तातडीने निलंबित करण्याची व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी खासदार भोसले यांनी यावेळी केली. दबावाला भित नसल्याचे प्रांताधिका-यांचे स्पष्टीकरण...कारवाई कायदेशीर मार्गानेच केल्याचे सांगून कोणाच्या दबावाला मी भीत नाही, असे प्रांताधिकारी किशोर पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हा वाद अधिकच चिघळण्याची चिन्हे आहेत.