शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

पांढरेपाडा येथे खडड्यांचे २ बळी

By admin | Updated: August 22, 2016 03:32 IST

वाडा - मनोर महामार्गावरील पांढरे पाडा येथे काल रात्रीच्या सुमारास रस्त्यावर पडलेला खड्डा दुचाकीस्वार चुकवत असतांना त्याचा तोल गेला.

वाडा : वाडा - मनोर महामार्गावरील पांढरे पाडा येथे काल रात्रीच्या सुमारास रस्त्यावर पडलेला खड्डा दुचाकीस्वार चुकवत असतांना त्याचा तोल गेला. याच सुमारास जवळून जाणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वारांना दिलेल्या धडकेने दोन दुचाकीस्वार जागीच ठार झाले तर ट्रकचा वाहक गंभीररित्या जखमी झाला आहे. या घटनेने संतप्त झालेल्या नागरिकांनी आज सुमारे अडीच तास पांढरेपाडा येथे रास्ता रोको करून सुप्रिम कंपनीच्या हलगर्जीपणामुळे अपघात झाल्याने भरपाई देण्याची मागणी केली. दरम्यान, पोलिसांच्या आश्वासननंतर आंदोलन मागे घेण्यात आले. अमति सवरा (२६) नितीन सांबरे (२१ ) अशी मृत्यूमुखी पडलेल्या तरूणांची नावे आहेत. तर महेंद्र कवळे (२२) हा गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर ठाणे येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भिवंडी वाडा मनोर हा रस्ता खड्डेमय झाला असून शनिवारी रात्री पांढरे पाडा येथे खड्डा चुकवतांना एका दुचाकीस्वाराचा तोल गेला. त्यानंतर त्याच सुमारास एक ट्रक जात असताना त्याने दुचाकी स्वारांना जोराची धडक दिली. त्यानंतर ट्रक एका झाडावर आदळला या अपघातात दुचाकीस्वार अमित सवरा व नितीन सांबरे ट्रक खाली जाऊन गंभीररित्या जखमी होऊन जागीच त्यांचा मृत्यू झाला. तर ट्रक झाडाला आदळल्याने वाहक महेंद्र कवळे हा गंभीर रित्या जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी ठाणे येथे हलविण्यात आले आहे. >पोलिसांची मध्यस्थी सफलपांढरे पाडा येथे रास्ता रोको करून सुप्रिम कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे हे बळी गेल्याने कंपनीवर गुन्हा दाखल करावा व नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. वरील मागण्या मान्य होईपर्यंत प्रेतावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतला. यामुळे सुमारे दोन तास रास्ता रोखून धरला होता. अखेर वाड्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र नाईक यांनी मध्यस्थी करून स्थानिक ग्रामस्थ सुप्रिम कंपनी प्रशासन यांची येत्या दोन दिवसांत बैठक घडवून त्यावर चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला व वाहतूक पूर्वी होऊ लागली.