शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारच्या ओढ्यात बुडून दोन शाळकरी भावांचा मृत्यू

By admin | Updated: August 16, 2016 16:39 IST

लातूरपासून जवळच असलेल्या हरंगुळ येथे जलयुक्त शिवारच्या नाल्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला

ऑनलाइन लोकमतलातूर, दि. 16 - लातूरपासून जवळच असलेल्या हरंगुळ येथे जलयुक्त शिवारच्या नाल्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. तेजस (वय १२) आणि सौरव अंगद पन्हाळे (वय ८) अशी मयताची नावे आहेत. काल दुपारी हे घरून सायकल घेऊन बाहेर गेले होते. मात्र रात्रीपर्यंत परतले नाहीत. यामुळे शोधाशोध सुरू झाली तेव्हा हा प्रकार समोर आला. लातूर तालुक्यातील हरंगुळ येथे जलयुक्त शिवार योजनेतून मोठा नाला विकसित करण्यात आला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. १५ ऑगस्ट दिनी तेजस आणि सौरव ही मुले दुपारी तीन वाजता सायकल घेऊन गायब झाली होती. रात्र झाली तरी मुले घराकडे परत आली नाहीत म्हणून आज शोधाशोध केली असता या मुलांची सायकल या नाल्याच्या बाजूला सापडली. त्यानंतर तपास केला असता नाल्यात या दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले. यानंतर या घटनेचा उलगडा झाला. याप्रकपणी लातूरच्या एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दोन्ही मुलांवर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दाम्पत्याला होती ही दोनच मुले... हरंगुळ गावात मजुरी करून राहणा-या अंगद पन्हाळे यांना तेजस आणि सौरव ही दोनच अपत्य होती. दोघेही लातूरच्या सानेगुरूजी विद्यालयात शिकत होते. तेजस सहावीला तर सौरव तिसरीला शिकत होता. घरावर पडलेल्या या काळाच्या घालाने पन्हाळे पती पत्नीला शोक अनावर झाला होता.