शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

दानवेंच्या तोतया पीएविरोधात फसवणुकीचे आणखी दोन गुन्हे

By admin | Updated: May 21, 2017 01:37 IST

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचे नाव सांगून राज्यभरातील अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या गणेश पाटील बोरसे याला क्रांतीचौक

- लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचे नाव सांगून राज्यभरातील अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या गणेश पाटील बोरसे याला क्रांतीचौक पोलिसांनी एका व्यापाऱ्यास गंडविल्याप्रकरणी अटक केली. त्याच्या विरोधात शुक्रवारी रात्री सिटीचौक आणि वाळूज पोलीस ठाण्यांत देखील फसवणुकीचे आणखी दोन गुन्हे नोंदविण्यात आले. बोरसेविरोधात २४ तासांत दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या तीन झाली आहे.रावसाहेब दानवे यांचा जवळचा नातेवाईक असून, त्यांचा पी.ए. आहे, असे सांगून गणेश बोरसे (४६) याने राज्यभरातील अनेकांकडून कोट्यवधी रुपये उकळले. याविषयीच्या तक्रारी आल्यानंतर खुद्द खा. दानवे त्याचा शोध घेत होते. परभणी येथील प्रमोद वाकोडकर या व्यापाऱ्यास बोरसेने १ लाख रुपयांस फसविल्याची तक्रार गुरुवारी रात्री नोंदविल्यानंतर बोरसेला मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली.विकास वसंतराव कुलकर्णी (४६) या भाजपा कार्यकर्त्यांकडून बोरसेने दोन लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे. विकास यांचा मित्र गणेश कोंडीबा दांगोडे (रा.वानेगाव) यास नोकरीची गरज होती आणि त्यासाठी बोरसेने दहा लाख रुपयांची मागणी केली. मैत्रीखातर विकास यांनी अ‍ॅडव्हान्स म्हणून दोन लाख रुपये दिले. त्यानंतर विकास यांनी याचा पाठपुरावा सुरू केल्यावर बोरसे उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यास पोलिसांनी पकडल्याचे समजताच कुलकर्णी यांनी वाळूज पोलिसांत धाव घेतली.तर, पैठण एमआयडीसीमध्ये प्लॉट मिळवून देण्याच्या नावाखाली बोरसे याने एका व्यावसायिकाकडून अडीच लाख उकळल्याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. श्रीनिवास श्रीपाद कुलकर्णी असे तक्रारदार यांचे नाव असून तेही भाजपा कार्यकर्ते आहेत. श्रीनिवास यांनी सिटीचौक ठाण्यात १९ मे रोजी आरोपीविरोधात तक्रार नोंदविली.बोरसेच्या घराची पोलिसांकडून झडतीगणेश बोरसे याच्या जालना जिल्ह्यातील करजगाव येथील घराची औरंगाबाद पोलिसांनी शनिवारी झडती घेतली. या प्रकरणी पोलिसांच्या रडावर असलेले काही संशयित फरार झाले आहेत. पोलिसांना त्याच्या घरात काही शैक्षणिक कादगपत्रे, लेटर पॅड व अन्य दस्तावेज सापडले. यामध्ये बोरसेच्या संपर्कात असणाऱ्या काहींची नावे आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही जणांचा समावेश असण्याची शक्यता असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.