शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीत दोन मतप्रवाह

By admin | Updated: August 12, 2014 02:22 IST

आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेच्या २८८पैकी १४४पेक्षा एकही जागा कमी मिळता कामा नये,

मुंबई : आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेच्या २८८पैकी १४४पेक्षा एकही जागा कमी मिळता कामा नये, अशी आग्रही भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली असली तरी याच आकड्याचा हट्ट न धरता लवकर आघाडी करण्यावर भर द्या, असे मत काही ज्येष्ठ मंत्र्यांनी व्यक्त केल्याचे समजते.सूत्रांनी सांगितले की, अजित पवार यांची नजर मुख्यमंत्रिपदावर आहे आणि १४४ जागा लढविल्यास ‘मिशन मुख्यमंत्री’ सोपे होईल, असे त्यांना वाटते. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जास्त वेळ मिळावा म्हणून जागावाटपाचा फॉर्म्युला तातडीने ठरवावा. कोणाला किती आणि कोणत्या जागा मिळतील, हे नक्की करावे असे पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ मंत्र्यांना वाटते. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर काही जणांनी तशी भावनाही व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. जागावाटपाबाबत आघाडीतील वाद चिघळले तर त्याचा फटका निवडणुकीमध्ये बसेल, असे मानणारा एक वर्ग राष्ट्रवादीमध्ये आहे.काँग्रेसने कधीही न जिंकलेल्या वा फारतर एखादवेळी जिंकलेल्या जागा राष्ट्रवादीच्या माथी मारल्या जात असतील तर त्या घेऊन १४४ जागांचा आकडा गाठण्याबाबतही पक्षात मतभेद असल्याचे म्हटले जाते. २००९मध्ये राष्ट्रवादीने ११४ तर काँग्रेसने १७४ जागा लढविल्या होत्या. राष्ट्रवादीला १० जागा वाढवून देण्याची तयारी काँग्रेसने यापूर्वीच दाखविली आहे. याचा अर्थ १२४-१६४ असा फॉर्म्युला मान्य करण्याची काँग्रेसची तयारी आहे. त्यात आणखी आठ-दहा जागा पदरी पाडून घ्याव्यात आणि जागावाटपाचा तिढा लवकरात लवकर सोडवावा की १४४ जागांसाठी ताणून धरावे यावरून राष्ट्रवादीतच मतभेद दिसून येत आहेत. तुटेपर्यंत ताणू नका, असा सल्ला पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिलेला होता; पण त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. (विशेष प्रतिनिधी)