शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

अपघात विमा दावे घोटाळाप्रकरणी दोन सदस्यीय समिती

By admin | Updated: October 23, 2016 00:54 IST

अपघात विमा दावे घोटाळ्याच्या न्यायिक चौकशी अहवालाचा अभ्यास करण्यासाठी दोन सदस्यीय समिती गठित करण्याचा निर्णय बार कौन्सिल आॅफ इंडियाने घेतला आहे.

- राजेश निस्ताने,  यवतमाळअपघात विमा दावे घोटाळ्याच्या न्यायिक चौकशी अहवालाचा अभ्यास करण्यासाठी दोन सदस्यीय समिती गठित करण्याचा निर्णय बार कौन्सिल आॅफ इंडियाने घेतला आहे.बार कौन्सिल आॅफ इंडियाच्या कार्यकारिणीची बैठक १६ आॅक्टोबर रोजी झाली. त्यात निवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश विद्या खरे यांनी केलेल्या चौकशी अहवालावर चर्चा झाली. या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी बार कौन्सिल आॅफ इंडियाचे सहअध्यक्ष अ‍ॅड. ठाकूर (हिमाचल प्रदेश) आणि अ‍ॅड.आर.बी. शहा (गुजरात) यांची समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही समिती महिनाभरात आपला अहवाल सादर करणार आहे. शासनाच्या अधिपत्याखालील विमा कंपन्यांकडून लाखो रुपयांची रक्कम नुकसानभरपाईच्या नावाखाली उकळण्याचे प्रकार राज्यात सर्वत्र सुरू आहेत. अपघाताच्या वेळी ‘अज्ञात वाहन’ असे एफआयआरमध्ये नमूद असताना, नंतर केव्हा तरी अचानक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उभा करून एखादे वाहन रेकॉर्डवर आणले जाते. त्याचे चालक-मालक २५ ते ५० हजारांत ‘मॅनेज’ केले जातात. या रकमेसाठी ते अपघाताची जबाबदारी स्वत:वर घेतात. त्या आधारे २० लाखांपासून सव्वा ते दीड कोटीपर्यंत अपघात विमा दावा केला जातो. अपघात विमा प्राधिकरणही फार चिरफाड न करता दावे मंजूर करतात. त्याचाच फायदा घेऊन विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाईपोटी सर्रास लाखोंच्या रकमा उकळण्याचा सपाटा सुरू होता. या प्रकरणात विमा कंपन्यांचे काही सर्वेअरही मॅनेज केले जातात.या मुद्द्यांवर होणार अभ्यास न्या. खरे यांचा रिपोर्ट ग्राह्य धरायचा की नाही, या अहवालावरून तपास सीबीआयकडे द्यायचा की सीआयडीकडे, एफआयआर सरकारने करावा, बार कौन्सिलने की न्यायालयाने आदी विविध मुद्द्यांवर ही समिती अभ्यास करणार आहे. ‘लोकमत’ने केला भंडाफोडअपघात विमा दावे घोटाळ्याचा ‘लोकमत’ने भंडाफोड केला आहे. ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेची दखल घेऊन बार कौन्सिल आॅफ इंडियाने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलला दिले होते. त्यानुसार निवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश विद्या खरे यांची नियुक्ती करण्यात आली.भरपाई विमा कंपनीऐवजी वाहन मालकाकडून अपघात विमा दावे घोटाळ्याबाबत ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेमुळे अपघात विमा दावे प्राधिकरणही सजग झाले. या प्राधिकरणाचे दारव्हा (जि. यवतमाळ) येथील सदस्य तथा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश ए.व्ही. सेदानी यांनी एका प्रकरणात सुमारे ४५ लाखांची नुकसानभरपाई ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीऐवजी वाहन मालक-चालकाकडून वसूल करण्याचे निर्देश दिले. एकूण तीन प्रकरणांत सुमारे दीड कोटींची नुकसानभरपाई विमा कंपनीऐवजी चालक-मालकाकडून वसुलीचे आदेश दिले गेले.दोन सदस्यीय समिती गठित झाली असून, त्यांच्या अहवालानंतरच कारवाईची पुढील दिशा निश्चित होणार आहे. - अ‍ॅड. सतीश देशमुख, उपाध्यक्ष,बार कौन्सिल आॅफ इंडिया