शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

निकामी दारुगोळ््यांच्या स्फोटात दोन ठार

By admin | Updated: October 22, 2014 05:48 IST

लष्कराच्या युद्ध सराव क्षेत्रात निकामी झालेला दारुगोळा गोळा करताना झालेल्या स्फोटात दोन जण ठार झाले, तर दोन जखमी झाले आहेत.

अहमदनगर : लष्कराच्या युद्ध सराव क्षेत्रात निकामी झालेला दारुगोळा गोळा करताना झालेल्या स्फोटात दोन जण ठार झाले, तर दोन जखमी झाले आहेत.सुभाष दामू निकम (४०) व गणेश शिवाजी गायकवाड (४२) अशी मृतांची नावे असून दोघेही खारकर्जुने येथील रहिवासी आहेत. अहमदनगर तालुक्यातील खारे कर्जुने (के. के.) रेंजमध्ये मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर लष्करी आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून स्फोटाचा तपास सुरू झाला आहे.नगर तालुक्यात खारे कर्जुने शिवारात आशिया खंडातील सर्वात मोठे लष्कराच्या युद्ध सरावाचे क्षेत्र आहे. या लष्करी हद्दीत नेहमीच युद्धाचा सराव केला जातो. त्यामुळे सरावादरम्यान तोफगोळे डागले जातात. त्यानंतर निकामी झालेले तोफगोळे, दारुगोळ््यांचे भंगार गोळा करण्यासाठी अनेक जण जीवावर उदार होतात. खारे कर्जुने ते भाळवणी या रस्त्याजवळून ही हद्द जाते. युद्ध सरावाच्या क्षेत्रालगत दगडांच्या भिंती ओलांडून अनेक जण डागलेले तोफगोळे, दारुगोळे घेण्यासाठी जातात. या भंगार विक्रीतून अनेकांचा उदरनिर्वाह चालतो. निकामी झालेला तोफगोळा हाताळताना येथे अनेकवेळा दुर्घटना घडल्या असून आतापर्यंत ५० पेक्षा जास्त जणांचा बळी गेला आहे. मंगळवारी असाच प्रकार घडला. निकामी तोफगोळे हाताळत असतानाच स्फोट झाला. त्यात गंभीर जखमी होवून दोघांचा मृत्यू झाला. भानुदास गोपाळराव गायकवाड यांच्यासह दोन जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)