शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

हरविलेल्या दोन मुली वाराणसीत सापडल्या!

By admin | Updated: April 29, 2016 06:06 IST

नागपाडा मिसिंग मिस्ट्रीमागे महिला आरोपी असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

मुंबई : नागपाडा मिसिंग मिस्ट्रीमागे महिला आरोपी असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. हरविलेल्या तीन मुलांपैकी दोन मुली वाराणसीत सापडल्या आहेत. आंटी म्हणून बोलत असलेल्या या महिलेसोबत तीन चिमुकले मुंबईहून वाराणसीत पोहचले. त्यानंतर ४ वर्षीय मुलासोबत ती निघून गेल्याचे मुलींचे म्हणणे आहे. त्यामुळे या संशयित आंटीच्या मागावर सध्या पोलीस आहेत. नागपाडा नयानगर येथून २१ ते २४ एप्रिलदरम्यान तब्बल चार मुले बेपत्ता झाली. यापैकी २४ तारखेला खेळता खेळता एकाच वेळी तरन्नुम खासुल (६), गुलफाम खासुल (४) आणि कुलसुम खान (६) तिघेही गायब झाल्याने खळबळ उडाली होती. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा याचा अधिक तपास करत असताना गुरुवारी यापैकी दोन मुली वाराणसीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सध्या त्या अस्मिता चाईल्ड लाइन संस्थेच्या ताब्यात आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी ७.१० वाजण्याच्या सुमारास वाराणसीत दोन मुली घाबरलेल्या अवस्थेत फिरतअसताना एका हवालदाराचे लक्ष त्यांच्याकडे गेले. चौकशीत त्या मुंबईहून एका महिलेसोबत आल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पोलीस हवालदाराने त्या मुलींना तत्काळ अस्मिता चाईल्ड लाइफ संस्थेच्या ताब्यात दिले. त्यांनी केलेल्या चौकशीत त्या दोघी तरन्नुम आणि कुलसुम असल्याची माहिती समोर आली. संस्थेकडून गुरुवारी याबाबत माहिती मिळाली असून, शुक्रवारी पहाटेच्या टे्रनने पोलिसांचे पथक तेथे रवाना होणार असल्याची माहिती नागपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक शिवाजी कदम यांनी दिली. (प्रतिनिधी)