शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

‘एटीएम’च्या भरणामध्ये दोन कोटींचा अपहार

By admin | Updated: July 30, 2015 00:08 IST

संशयित फरार : रॅकेट शक्य; चार कोटींचा गोलमाल?

सातारा : एटीएम यंत्रात पैसे भरण्याचे कंत्राट घेतलेल्याच्या कर्मचाऱ्याने तब्बल १ कोटी ९१ लाख ५१ हजार ९०० रुपयांचा अपहार केल्याची खळबळजनक घटना साताऱ्यात घडली असून, संशयित कर्मचारी फरार झाला आहे. दरम्यान, एटीएममध्ये भरणा करताना पैसे ढापणाऱ्यांचे रॅकेटच कार्यरत असून, या टोळक्याने चार कोटींहून अधिक रकमेचा गोलमाल केल्याची चर्चा बँकिंग वर्तुळात रंगली आहे.यासंदर्भात वैभव राजेंद्र साळुंखे (रा. बोरगाव, ता. सातारा) याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, त्याला याची कुणकुण लागल्यापासून साळुंखे फरार झाला आहे. त्याचे काही अन्य साथीदार असावेत आणि त्यांनी याच पद्धतीने मोठ-मोठ्या रकमा परस्पर पळविल्या असाव्यात, असा पोलिसांचा कयास आहे. त्यामुळे हा गोलमाल किती दिवसांपासून चालला आहे, यावर या प्रकरणाची व्याप्ती ठरणार आहे. एटीएममध्ये नोटांचा भरणा करण्याचे कंत्राट अजय दिलीप हगवणे (वय २६, रा. पांडेवाडी, ता. वाई) यांना मिळाले आहे. दोन प्रमुख राष्ट्रीयीकृत बँकांच्या एटीएममध्ये भरणा करताना त्याचा कर्मचारी असलेल्या वैभव साळुंखेने ‘हाथ की सफाई’ केल्याचे आढळून आल्यानंतर हगवणे यांनीच त्याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणात जितकी रक्कम एटीएममध्ये भरणा करायची आहे तेवढी न करता कमी रक्कम भरणा केल्याचे आढळून आले असून, काहीवेळा रक्कम अजिबातच जमा न केल्याचे निदर्शनास आले आहे. ही गोष्ट बँकांच्या लक्षात आल्यानंतर या प्रकरणास वाचा फुटली. साळुंखे याने पासवर्डमध्ये फेरफार करून हा सगळा गोलमाल केला असावा, असा पोलिसांना संशय आहे. एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कर्मचाऱ्यानेच एवढा मोठा अपहार केल्याने बँकिंग क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)शोधासाठी पथक तैनातवैभव साळुंखे याच्या शोधासाठी शहर पोलिसांनी दोन पथके तयार केली असून, ही पथके ठिकठिकाणी पाठविण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. साळुंखेला पकडल्यानंतरच या प्रकरणातील बरीच काही माहिती मिळू शकेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.