शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खंबाटकी बोगद्याजवळ दोन अपघातांत दोघे ठार

By admin | Updated: November 23, 2015 02:27 IST

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगद्याजवळ झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन ठार, तर ५१ जण जखमी झाले आहेत.

खंडाळा/भुर्इंज : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगद्याजवळ झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन ठार, तर ५१ जण जखमी झाले आहेत. दोन खासगी प्रवासी बसची रविवारी पहाटे ‘एस’ वळणावर समोरासमोर धडक झाली. यामध्ये एक ठार, तर ४५ जण जखमी झाले. तर दुसरा अपघात वेळे हद्दीत बोगद्याजवळ रविवारी सायंकाळी झाला. यातही एक जण ठार झाला.खंबाटकी बोगदा ओलांडून खासगी प्रवासी बस रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास गोव्याहून मुंबईकडे निघाली होती. ‘एस’ वळणावर बस आली असता अचानक समोरून उलट्या दिशेने दुसरी खासगी प्रवासी बस भरधाव वेगाने आली. त्यामुळे दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक बसली. ही धडक एवढी भीषण होती की, शिराळ्याकडे निघालेली बस पाचशे मीटर मागे ढकलली गेली आणि रस्त्याच्या बाजूला सुमारे वीस फूट खोल खड्ड्यात उलटली. दोन्ही गाड्यांच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. अपघातानंतर बसचालकाने गाडीतून उडी मारून पोबारा केला.या अपघातात ४५ जण जखमीझाले, तर दीपक शिवाजी निकम(४०, रा. इंदिरानगर, कळवा, मुंबई)हे ठार झाले.दुसरा अपघातही वाई तालुक्यातील वेळे येथे खंबाटकी घाटाच्या बोगद्याजवळच रविवारी सायंकाळी झाला. कार बाजूच्या कठड्यावर आदळल्यामुळे वाहनचालक सतीश बाळू वैराट (५०, रा. कॅन्टोमेंट बोर्ड, खडकी, पुणे) हे ठार झाले. तर तानाजी सुखदेव ननवरे (४०, रा. खडकी पुणे) हे गंभीररीत्या जखमी झाले असून, त्यांना खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याबरोबर असणारे इतर पाच जण किरकोळरीत्या जखमी झाले आहेत. (प्रतिनिधी)