शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

चार लाखांचा गंडा घालणार्‍या दोघांना अटक

By admin | Updated: May 27, 2014 22:58 IST

परदेशातून मोटारसायकल मागवण्यासाठी एका व्यवसायिकाला चार लाख रूपयांना गंडा घालणार्‍या दोन आरोपींनी गुन्हे शाखने अटक केली.

मुंबई: परदेशातून मोटारसायकल मागवण्यासाठी एका व्यवसायिकाला चार लाख रूपयांना गंडा घालणार्‍या दोन आरोपींनी गुन्हे शाखने अटक केली. यात एक आंतरराष्ट्रीय टोळी सक्रीय सहभागी असल्याचा पोलिसांचा कयास असून त्यांचा शोध सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी दिली.भारतामध्ये न मिळणार्‍या मोटारसायकल परदेशातून मागवून देण्याचे आमिष दाखवत ही टोळी वेबसाईटच्या आधारे काही ग्राहकांसोबत संपर्क साधत होती. बोरीवलीत राहणारे व्यावसायिक नितीन देसाई यांनाही एक विदेशी बनावटीची महागडी मोटारसायकल खरेदी करायची होती. त्यामुळे त्यांनी या वेबसाईटवर जाऊन त्यावर असलेल्या एका क्रमांकावर फोन केला. फोन केलेल्या इसमाने एका बँकखात्याचा क्रमांक देऊन त्यात चार लाख रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानुसार देसाई यांनी त्या खात्यामध्ये पैसे जमा केले. मात्र पैसे देऊन दोन महिने उलटले तरी मोटारसायकल येत नसल्याने त्यांनी त्या इसमाला अनेकदा फोन केले. मात्र त्या इसमाकडून नेहमीच वेगवेगळी कारणे मिळत होती. काही दिवसानंतर तर आरोपीचा फोन बंद झाल्याने व्यावसायिकाने याबाबत गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या अधिकार्‍यांनी रविवारी बोरिवली येथून दिलशाद मन्सूरी आणि अब्दुल गफार या दोघा आरोपींना अटक केली.पोलिसांनी या आरोपींची झडती घेेतली असता त्यांच्याकडून काही बनावट पॅनकार्ड, पासपोर्ट, दहा मोबाईल आणि विविध बँकेचे पासबुक आणि एटीएम कार्ड हस्तगत करण्यात आले. पोलिसांनी त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत ही टोळी गेल्या अनेक वर्षापासून अशाप्रकारे लोकांना फसवत असल्याचे स्पष्ट झाले. या टोळीमध्ये काही नायजेरियन नागरिकही सामील असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. .................................................................