शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चोवीस वर्षीय ओंकार बनला सैन्यदलात कॅप्टन

By admin | Updated: December 10, 2014 23:49 IST

आष्ट्याच्या शिरपेचात मानाचा तुरा : शहरातील पहिला उच्चपदस्थ अधिकारी

आष्टा : सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील ओंकार किरण महाजन (वय २४) याची अल्पावधितच भारतीय सैन्यदलात कॅप्टनपदी निवड झाली आहे. घरी सैन्यदलातील कोणताही वारसा नसताना, जिद्द, मेहनत व चिकाटीच्या जोरावर ओंकार महाजन याने सैन्यदलात उत्तुंग यश मिळविले. शहरातील पहिला कॅप्टन होण्याचा मान ओंकार महाजन याने पटकावित आष्ट्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.ओंकार हा आष्टा येथील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा. वडील किरण महाजन यांचे मेडिकलचे दुकान होते. आष्टा मेडिकल असोसिएशन व जायंटस् ग्रुप आॅफ आष्टाचे ते माजी अध्यक्ष आहेत. ओंकार याचे दहावीपर्यंतचे शिक्षण तासगाव येथील गुरूवर्य दादोजी कोंडदेव सैनिक शाळेत झाले. दहावीत चांगले गुण मिळाल्यानंतर त्याला सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था (एस.पी.आय.) औरंगाबाद या राज्य शासनाच्या संस्थेत प्रवेश मिळाला. दोन वर्षे कसून सराव केल्यानंतर त्याने १२ वीत यश मिळाले. टी. ई. एस. (टेक्निकल एन्ट्री)ला १६ जानेवारीला प्रवेश मिळाल्यानंतर डिसेंबर २००९ अखेर इंडियन मिलिटरी आॅफ मिलिटरी इंजिनिअरिंग येथे जानेवारी २०१० ते २०१३ अखेर ट्रेनिंग पूर्ण केले. ८ डिसेंबर २०१२ ला ओंकारची सैन्यदलात लेफ्टनंटपदी निवड झाली. वडिलांचा ८ डिसेंबर हा वाढदिवस. याचदिवशी ओंकारची लेफ्टनंटपदी निवड झाल्याने वडिलांना अनोखी भेट मिळाली. आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. २०१४ मध्ये त्याची हिस्सार (हरियाना) येथे आर्मड् इंजिनिअरिंग लेफ्टनंट पदावरून कॅप्टनपदी निवड झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी नोकरीच्या वाटेवरूनच जाण्याऱ्या युवकांना ओंकारने वेगळा आदर्श घालून दिला आहे. (वार्ताहर)