शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

युतीमुळेच भाजपचे पंचवीस वर्षे झाले नुकसान

By admin | Updated: April 30, 2015 00:29 IST

बाळ माने : राजकारणातील पोकळी भरून काढण्यास भाजपला अपयश आल्याची कबुली

मंडणगड : पंचवीस वर्षांच्या युतीच्या राजकारणात भाजपचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे राजकारणात पोकळी निर्माण होऊन ती भरुन काढण्यास पार्टीस अपयश आले त्याचा फटका सर्वच निवडणुकात सोसावा लागला आहे, अशी कबुली प्रतिपादन भाजपा प्रदश प्रवक्ते बाळ माने यांनी मंडणगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.भाजपा सदस्य नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर तालुक्याचा दौरा करणाऱ्या माने यांनी विविध प्रश्नावर पत्रकारांशी संवाद साधला. यात आगामी काळात जिल्ह्यात शत-प्रतिशत भाजपा-जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या स्वबळावरील निवडणुका हा पक्षासमोर अतिशय महत्त्वाचा मुद्दा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.निवडणुकांमध्ये पक्षाचे अस्तित्त्व दाखवून देण्यासाठी कार्यकर्ते कामास लागले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले़ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवेचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकास कामे वास्तवात आणण्यासाठी हे गाव दत्तक पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्या आदर्श ग्राम विकास योजनेच्या घोषणेअंतर्गत खासदार अमर सांबळे यांनी दत्तक घेतले असल्याचे त्यांनी सांगीतले.जिल्ह्यात एक लाख सदस्य नोंदणी व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मिशन थर्टीप्लस या दोन विषयांवर भाजपने जिल्ह्यात आपले लक्ष केंदी्रत केले आहे, असे ते म्हणाले. कोकणातील पक्षाची व्याप्ती लक्षात घेता अगदी ग्रामपंचायत स्तरापासून पक्षाचे काम वाढेल, यावर लक्ष देण्यात आले असून नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांमध्ये शक्य आहे तेथे उमेदवार उभे करण्यात आले. देवगड, गुहागर व रत्नागिरी मतदारसंघांपुरती पक्षाची ओळख मर्यादित न ठेवता सर्वच ठिकाणी वाढीसाठी प्रयत्न सुरु आहेत. २०१७ जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक जिल्हा परिषद व पंचायत समिती गण बांधण्याचे काम सुरु आहे. तालुक्यात पक्ष बांधणीसाठी प्रयत्न सुरू असून येथे लघु उद्योगांची निर्मिती करुन पर्यटन मत्सव्यवसायाचे माध्यमातून रोजगार निर्मितीचे प्रयत्न सुरु आहेत, असे माने यांनी यावेळी सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष सचिन थोरे, उपाध्यक्ष राजेश नगरकर, युवा आघाडी तालुकाध्यक्ष गिरीष जोशी आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)