शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

अपघाताच्या नुकसानभरपाई रकमेत २१ वर्षांनंतर सहापट वाढ

By admin | Updated: March 17, 2017 03:46 IST

मोटार अपघात दावा लवादाने (एमएसीटी) आदेश दिलेल्या नुकसानभरपाईच्या रकमेत पाचपट वाढ करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला निवृत्त जवानाच्या कुटुंबीयांना नऊ

मुंबई : मोटार अपघात दावा लवादाने (एमएसीटी) आदेश दिलेल्या नुकसानभरपाईच्या रकमेत पाचपट वाढ करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला निवृत्त जवानाच्या कुटुंबीयांना नऊ लाख ७५ हजार रुपये देण्याचा आदेश बुधवारी दिला. लवादाने आदेश दिलेल्या नुकसानभरपाईच्या रकमेत वाढ मिळवण्यासाठी जवानाच्या कुटुंबीयांना २१ वर्षे वाट पाहावी लागली.राज्य सरकारच्या दुधाच्या टँकरच्या धडकेत मृत्यू पावलेल्या निवृत्त जवानाच्या कुटुंबीयांना नऊ लाख ७५ हजार रुपये नुकसानभरपाई द्या, असा आदेश बुधवारी न्या. एम. एस. सोनक यांनी राज्य सरकारला दिला. मोटार अपघात दावा लवादाने ५ आॅगस्ट १९९५ रोजी राज्य सरकार व अन्य पाच प्रतिवाद्यांना जवानाच्या कुटुंबीयांना एक लाख ६५ हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला होता. या आदेशाला १९९६मध्ये राज्य सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले.२० वर्षे संरक्षण दलात काम केल्यानंतर कैलाशचंद्र कौशल यांनी सेवेतून निवृत्त होत इंदूर ते मुंबई भाजीपाल्याची वाहतूक करण्यासाठी ट्रक विकत घेतला. ट्रक विकत घेण्यासाठी त्यांनी कर्जही घेतले होते.कौशल यांच्या दुर्लक्षामुळेच त्यांना जीव गमवावा लागला. दुधाचा टँकर चालवणाऱ्या चालकाच्या दुर्लक्षामुळे कौशल यांचा अपघात झाला, हे सिद्ध करणारे पुरावे उपलब्ध नाहीत, असा युक्तिवाद सरकारतर्फे अ‍ॅड. योगेश डबके यांनी न्या. सोनक यांच्यापुढे केला. ‘मृत व्यक्तीचा मुलगा दिनेश याने दिलेल्या जबाबावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. कारण दुर्घटनेवेळी तो अल्पवयीन होता आणि तो लाभार्थीही आहे,’ असे डबके यांनी न्या. सोनक यांना सांगितले.‘दिनेश हा लाभार्थी आहे आणि घटनेच्या वेळी तो अल्पवयीन होता, या सरकारी वकिलांच्या युक्तिवादात तथ्य नाही. या खटल्यामधील परिस्थितीनुसार आणि सत्यतेनुसार, तो या खटल्यामधील नैसर्गिक साक्षीदार आहे. त्यामुळे त्याची साक्ष फेटाळली जाऊ शकत नाही,’ असे स्पष्ट करत न्या. सोनक यांनी दिनेशची साक्ष ग्राह्य धरली. लवादाने सर्व पुरावे योग्य तऱ्हेने ग्राह्य धरल्याचे न्या. सोनक यांनी निकालात म्हटले असले तरी लवादाने नुकसानभरपाईची रक्कम नीट मोजली नसल्याचे म्हटले. सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निकालांचा दाखला देत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला पीडित जवानाच्या कुटुंबीयांना नऊ लाख ७५ हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला. (प्रतिनिधी)