शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

पटसंख्या शून्य झाल्यामुळे पनवेलमधील तीन शाळा बंद

By admin | Updated: August 22, 2016 03:11 IST

पनवेल तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या तीन शाळांची पटसंख्या शून्य झाल्यामुळे शाळा तात्पुरत्या बंद पडल्या आहेत.

पनवेल : पनवेल तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या तीन शाळांची पटसंख्या शून्य झाल्यामुळे शाळा तात्पुरत्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांअभावी पनवेल तालुक्यातील मराठी शाळांवर संकट ओढावले आहे.पनवेल तालुक्यातील चाफेवाडी, चिंचवाडी आणि खंगारपाडा या शाळांची पटसंख्या शून्य झाल्यामुळे या शाळा बंद झाल्या आहेत. चाफेवाडी शाळेतील दोन विद्यार्थी माणगाव येथील आश्रमशाळेत गेले असल्याची माहिती शिक्षण विभागातून देण्यात आली तर चिंचवाडी शाळेतील विद्यार्थी शेजारच्या शाळेत गेले असल्यामुळे या शाळांतील पटसंख्या शून्य झाली आहे. परिणामी तिन्ही शाळा बंद झाल्या आहेत. या तीन शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांची तात्पुरती नियुक्ती अन्य शाळेत पर्यायी शिक्षक म्हणून करण्यात आली आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण २६४ शाळा असून एकूण विद्यार्थी संख्या २२,५७७ आहे.गतवर्षी पनवेल तालुक्यात ४ जुलैला शाळाबाह्य विद्यार्थी मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये ५४५ शाळाबाह्य विद्यार्थी सापडले होते. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी संख्येत चालू वर्षी घट झाली असून २०१५ रोजी विद्यार्थी संख्या बावीस हजार आठशे अठरा होती. विद्यार्थी संख्या घटल्यामुळे तालुक्यातील तीन शाळेत शून्य पटसंख्या झाली आहे. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दुर्गम आदिवासी भागातील मुले किमान प्राथमिक शिक्षण घेत आहेत. तालुक्यातील एकूण २१ केंद्रामधील जवळपास २९ शाळांमध्ये २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या आहे. यामुळे शासनाच्या नवीन धोरणानुसार २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या या शाळा बंद केल्या तर तालुक्यातील बऱ्याच विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे. दहा - पंधरा घरांच्या छोट्या वाड्याची बरीचशी गावे या पनवेल तालुक्यात आहेत. (वार्ताहर)