शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

तुरीचे बियाणे ७५ टक्क्यांनी महागले

By admin | Updated: May 19, 2016 06:11 IST

दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्यांवर यंदा बियाणांच्या दरवाढीचेही संकट कोसळले

सुनील कच्छवे,

औरंगाबाद- दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्यांवर यंदा बियाणांच्या दरवाढीचेही संकट कोसळले आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) यंदा तूर, मूग, उडीद, सोयाबीन या कडधान्यांसह ज्वारी आणि बाजरीच्या बियाणांच्या किमतीतही जबर वाढ केली आहे. तुरीचे बियाणे तब्बल ७५ टक्क्यांनी तर उडदाचे बियाणे दुपटीने महागले आहे.बियाणे दरवाढीमुळे शेतकऱ्यांचा पेरणीचा खर्च वाढणार आहे. खरिपाच्या तोंडावर महाबीजचे बियाणे बाजारात दाखल झाले आहे; परंतु दरवाढीमुळे शेतकऱ्यांना एक प्रकारे धक्काच बसला आहे. गतवर्षीपेक्षा यंदा तुरीच्या दरात सरासरी ७५, ज्वारी ३५, बाजरी ५, मुग ५० तर सोयाबीनच्या दरात ५ टक्केवाढ झाली आहे.राज्य सरकारकडून कडधान्याचे क्षेत्र वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यात येत आहे. परंतु दुसरीकडे मात्र, कडधान्यांच्या किमती वाढल्या आहेत. बियाणे महामंडळ हा राज्य सरकारचाच उपक्रम आहे. तरीही दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बियाणांच्या किमतीत वाढ झाल्यामुुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. मराठवाड्यात १० लाख हेक्टर क्षेत्रमराठवाड्यात खरिपाचे एकूण सरासरी क्षेत्र ४९ लाख ९ हजार हेक्टर इतके आहे. त्यात कडधान्य पिकांचे क्षेत्र १० लाख ६४ हजार हेक्टर आहे. कडधान्य पिकांमध्ये मराठवाड्यात प्रामुख्याने तूर, मूग आणि उडदाचे प्रमाण अधिक आहे. कृषी विभागानुसार यंदा तुरीचे क्षेत्र ५ लाख ८७ हजार हेक्टर, मुगाचे २ लाख १८ हजार आणि उडदाचे क्षेत्र एक लाख ९९ हजारहेक्टर प्रस्तावित करण्यात आलेले आहे.खर्च वाढल्यामुळे दरवाढ बियाणे निर्मितीसाठी महामंडळ शेतकऱ्यांकडूनच चांगल्या प्रतीच्या मालाची खरेदी करते. त्याकरिता शेतकऱ्यांना बाजारभाव आणि त्यावर २५ टक्के बोनस दिला जातो. त्यानंतर या मालावर प्रक्रिया करणे, त्याची वाहतूक, चाळणी, गाळणी, पॅकिंग या सर्वांचा खर्च काढून बियाणांची किंमत निश्चित केली जाते. हा सर्व खर्च वाढल्यामुळे यंदा बियाणांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. - जगदीश गिरी, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज