शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तुकाराम मुंढेंवर आज अविश्वास ठराव

By admin | Updated: October 25, 2016 02:32 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात मंगळवारी अविश्वास ठराव दाखल होणार आहे. मंगळवार, २५ आॅक्टोबरला अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी विशेष

नवी मुंबई : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात मंगळवारी अविश्वास ठराव दाखल होणार आहे. मंगळवार, २५ आॅक्टोबरला अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली आहे. १११ नगरसेवकांच्या सभागृहात भाजपाचे ६ सदस्य तटस्थ राहणार आहेत. शिवसेना, काँगे्रस, राष्ट्रवादी व अपक्ष नगरसेवकांनी ठरावास पाठिंबा दिला असून, ‘मुंडे हटाव’चा नारा देत नागरिकही मोठ्या प्रमाणात मुख्यालयाबाहेर एकत्र होणार आहेत. सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतल्याने राज्यभर प्रसिद्धी मिळविलेले सनदी अधिकारी तुकाराम मुुंढे यांची मे २०१६मध्ये नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. पहिल्याच दिवसापासून त्यांनी धाडसी निर्णय घेण्यास सुरुवात केली. निष्काळजीपणाचा ठपका ठेवून अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित केले. अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई करण्यास सुरुवात केली. पण, लोकप्रतिनिधींबरोबर संवाद ठेवला नसल्याने नाराजी वाढत गेली. पालिकेत आल्यापासून पाच महिन्यांत महापौर सुधाकर सोनावणे यांची एकदाही भेट घेतली नसल्याने त्यांनी मनपा मुख्यालयावर बहिष्कार टाकला. सर्वपक्षीय नगरसेवकांना आयुक्त भेटण्यासाठी वेळ देत नव्हते व त्यांनी सुचविलेली कामे करत नसल्याने नाराजी वाढली होती. तरी त्यांच्या चांगल्या कामामुळे सोशल मीडियामधून मात्र अनेकांनी पाठिंबा दिला आहे. मंगळवारच्या सर्वसाधारण सभेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)आयुक्तांवर पहिल्यांदाच अशी वेळ- पालिकेमध्ये १११ नगरसेवक आहेत. भाजपाच्या ६ नगरसेवकांनी तटस्थ राहण्याचे निश्चित केले असून, उर्वरित शिवसेना, काँगे्रस व राष्ट्रवादीच्या १०५ नगरसेवकांनी ठरावाच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच आयुक्तांवर अविश्वास ठराव मांडण्यात येत आहे. मुंढे सुटीवर अविश्वास ठरावाच्या पूर्वसंध्येला आयुक्त तुकाराम मुंढे हे एक महिन्याच्या रजेवर गेल्याचे वृत्त शहरात पसरले आहे. याविषयी अधिकृत माहिती पालिकेच्या जनसंपर्क विभागाने दिलेली नाही.