शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

तुकाराम मुंढेंची ‘दम’दार सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2017 02:35 IST

कार्यक्षम आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून लौकिक असलेल्या तुकाराम मुंढे यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या

पुणे : कार्यक्षम आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून लौकिक असलेल्या तुकाराम मुंढे यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) अधिकाऱ्यांच्या पहिल्याच बैठकीत बेशिस्तीला लगाम घालण्याची आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी कामाच्या वेळेत बदल करण्याबरोबरच कामकाजात शिस्त आणण्याच्यादृष्टीने अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. पहिल्याच बैठकीत अधिकाऱ्यांना मुंढे यांच्या कामाचा ‘दम’दार अनुभव आल्याची चर्चा ‘पीएमपी’त रंगली आहे.मुंढे यांनी ‘पीएमपी’च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर तासाभरात सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. सहव्यवस्थापकीय संचालक डी. पी. मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा कोल्हे, महाव्यवस्थापक (वाहतूक) अनंत वाघमारे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी योगेश होले, प्रशासन अधिकारी विजयसिंह परदेशी यांच्यासह अन्य अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.मुंढे यांनी बैठकीत पीएमपीच्या कामकाजाचा आढावा घेत सद्य:स्थिती जाणून घेतली. कामातील शिस्तीबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडे आग्रही भूमिका मांडली. पीएमपीची सध्याची कामाची वेळ सकाळी साडेदहा ते सायंंकाळी साडेपाच ही आहे. या वेळेत बदल करण्याचे आदेश मुंढे यांनी दिली. त्यानुसार आता ही वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.४५ अशी आठ तासांची असेल. तसेच ब्रेकडाऊनचे वाढते प्रमाण, मार्गावरील बसची संख्या यावरून नाराजी व्यक्त करीत त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. (प्रतिनिधी)हेल्पलाइन सक्षम करामुंढे यांनी बैठकीतच आपल्या मोबाइलवरून पीएमपीच्या हेल्पलाइनवर संपर्क साधला. मोबाइल स्पीकर मोडवर ठेवला होता. पाच-सहा रिंग वाजल्यानंतरही हेल्पलाइनवरून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून अधिकारीही स्तब्ध झाले. अखेर प्रतिसाद मिळाल्यानंतर मुंढे यांनी संबंधित कर्मचाऱ्याची हेल्पलाइनवर झाडाझडती घेतली. अधिकाऱ्यांनाही हेल्पलाइन सक्षम करण्याच्या सूचना दिल्या. तक्रार आल्यानंतर त्याचे २४ तासांत निराकरण करून संबंधितांना कळवावे, असा आदेश दिला. आयटीचा वापर वाढविणारडॉ. श्रीकर परदेशी तसेच इतर अधिकाऱ्यांनी घेतलेले चांगले निर्णय पुढेही कायम ठेवले जातील. परदेशी यांनी माहिती तंत्रज्ञानाचा (आयटी) वापर वाढवला होता. ‘आयटी’च्या उपयोगामुळे कार्यक्षमता वाढते. पारदर्शकताही येते. पर्यायाने संंस्थेच्या कामकाजातही सुधारणा होतात. त्यादृष्टीने अडचणींचा अभ्यास करून त्याचा विचार केला जाईल, असे सांगून मुंढे यांनी ‘आयटी’चा वापर वाढविण्याचे संकेत दिले.पीएमपी कर्मचाऱ्यांसाठी मुंढेसूत्रीअधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी वेळा पाळायला हव्यात.वाहक, चालकांनी आगारातून बस बाहेर काढताना एक मिनिटही उशीर करू नये. कर्मचाऱ्यांनी गणवेश घातलाच पाहिजे. चहा पिण्यासाठी बाहेर जाऊन वेळ घालवत कोठेही भटकू नये. बाहेर पडताना तशी नोंद करणे अपेक्षित आहे. धूम्रपान केलेले चालणार नाही.