शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

टीएसपी-कंत्राटदाराने लाटले पैसे

By admin | Updated: June 15, 2016 03:50 IST

टेक्निकल सर्व्हिस प्रोव्हायडर (टीएसपी) व्यक्ती, कंपन्या/फर्म आणि कंत्राटदार, तसेच स्थानिक राजकीय नेत्यांच्या संगनमतातून कोट्यवधी रुपयांची लूट करण्यात आल्याने, ग्रामीण पाणीपुरवठा

- यदु जोशी,  मुंबई

टेक्निकल सर्व्हिस प्रोव्हायडर (टीएसपी) व्यक्ती, कंपन्या/फर्म आणि कंत्राटदार, तसेच स्थानिक राजकीय नेत्यांच्या संगनमतातून कोट्यवधी रुपयांची लूट करण्यात आल्याने, ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचा पार बोजवारा उडाला आहे. ग्रामसभेने निवडलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा समित्यांना कोणतेही तांत्रिक ज्ञान नसल्याने टीएसपींचा सहारा घेतला. प्रकल्पाचा आराखडा तयार करवून घेण्यासाठी त्यांनी या टीएसपींना काम दिले, ते एक गौडबंगाल होते. कंत्राटदार, स्थानिक राजकारण्यांशी साटेलोटे करून त्यांनी योजना तयार केल्या. पाण्याचा उद्भव असलेले ठिकाण जलस्रोतासाठी न सुचविता, लांबचे ठिकाण सुचवायचे म्हणजे, त्यातून जादा पाइपलाइन लागेल आणि खरेदीमध्ये खाबूगिरी करता येईल, असे अनेक प्रकार गेल्या १५ वर्षांत घडले. कंत्राटदारांनी अत्यंत निकृष्ट पाइप वापरले, ते काहीच महिन्यांत फुटले. शिवाय, पाण्याची उचल विहिरींमधून करण्यासाठी निकृष्ट मोटारी खरेदी केल्या. राज्यात कुठे ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा समित्या, कुठे जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, तर कुठे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या योजनांवर डल्ला मारला. अकोला जिल्ह्यातील चिखलगावचा हा मासलेवाईक किस्सा. मोरणा नदीच्या पात्रात विहीर बांधण्याचे मूळ प्रस्तावात होते. ते ठिकाण बदलून विहीर हलविण्यात आली. ती दोन महिन्यांत कोरडीठाक पडली. आता नदी पात्रातून या विहिरीत पाणी आणले जात आहे. योजनेचे काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देताना ‘अर्थपूर्ण’ व्यवहार झाल्याची चर्चा आहे. लाखो रुपये खर्चूनही निकृष्ट कामे झाली. पळसोबढे, भेंडगाव, उमरदरी, मोझरी, महागाव, महारखेड, खेर्डा खुर्द, वरखेड देवदरी, कट्यार, दोनवडा या गावांच्या पाणी योजनांना घोटाळ्यांचा फटका बसला. ‘गेल्या १५ वर्षांत जिथे-जिथे पाणीपुरवठा योजना झाल्या, त्या गावांच्या चिठ्ठ्या टाका अन् कोणतीही चिठ्ठी उचलून पाहिले, तर घोटाळाच दिसेल,’ ही अकोला पूर्वचे भाजपाचे आमदार रणधीर सावरकर यांची प्रतिक्रिया बोलकी होती. ‘लोकमत’कडे तक्रारींचा पाऊसराज्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांमध्ये झालेला भ्रष्टाचार ‘लोकमत’ने मंगळवारच्या अंकात समोर आणल्यानंतर, ‘आमच्याही गावात असेच घडले आहे’ असे सांगणारे अनेक फोन आले. नांदेड, लातूर, पुणे, सोलापूर जिल्ह्यातून तर तक्रारींचा पाऊस पडला. नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यात ४८ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळाली आणि केवळ सहा पूर्ण झाल्या. असा झाला भ्रष्टाचार :  ठिकठिकाणांहून आलेल्या तक्रारींमध्ये, पाणीपुरवठा समितीच्या अध्यक्षांनी कामे न करता रक्कम लाटली, योजना पूर्ण न करताच ती पूर्ण झाल्याचे दाखविले, निकृष्ट पाइपलाइन वापरली, एकाच कामासाठी दोन हेडमधून पैसे उचलले, पाणीपुरवठा समित्यांऐवजी वैयक्तिक खात्यात पैसे जमा करण्यात आले, अशा एक ना अनेक गैरप्रकारांबद्दल लोक संतापून बोलले.