शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

मराठी रंगभूमीची व्याप्ती व लोकप्रियता वाढविण्यासाठी प्रयत्न करणार

By admin | Updated: August 22, 2016 02:11 IST

मराठी रंगभूमीविषयी आवड असणारा तरुण वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे.

मुंबई : मराठी रंगभूमीविषयी आवड असणारा तरुण वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे. साहित्य कला, नाट्यक्षेत्राचा मीसुद्धा रसिक असून, हे क्षेत्र पुढे नेऊन मराठी रंगभूमीची व्याप्ती व लोकप्रियता वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने महाराष्ट्र राज्य नाट्यमहोत्सवाच्या राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभाचे रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, नाट्य संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर, बाल नाट्यकार मीना नाईक, नेपथ्यकार बाबासाहेब पार्सेकर, अभिनेते रमेश वाणी, केश व रंगभूषाकार कृष्णाजी बोरकर, उदय तांगडी, सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह आदींच्या हस्ते ५५व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धेच्या, १३व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या आणि २८व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.नाट्यस्पर्धेतील विजेत्यांना शुभेच्छा देऊन तावडे पुढे म्हणाले, नाट्य स्पर्धसाठी तसेच विजेत्या उत्कृष्ट नाटकांची निवड करताना या क्षेत्रातील तज्ज्ञ व शासनाचे प्रतिनिधी यांच्यात मतभिन्नता निर्माण होऊ नये यासाठी ५ जणांची समिती नेमून त्याबाबतचे नियम करणार आहोत. ग्रामीण भागातील तसेच छोट्या कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सात विभागीय केंद्रांमध्ये एकांकिका महोत्सव घेण्याबाबतचा शासनाचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.या वेळी व्यावसायिक नाट्य स्पर्धा नाट्य निर्मिती प्रथम पारितोषिक रुपये ५ लाख, सोनल प्रॉडक्शन संस्थेच्या ‘डोंट वरी बी हॅपी’ या नाटकाला देण्यात आले. तसेच हौशी मराठी नाट्य स्पर्धा प्रथम पारितोषिक रुपये ३ लाख, महानगरपालिका कर्मचारी कलावंत संस्था, कला साधना या संस्थेच्या ‘असुरवेद’ या नाटकाला देण्यात आले. बालनाट्य स्पर्धा नाट्यनिर्मिती प्रथम पारितोषिक रुपये ५० हजार, ज्ञानदीप कलामंच, ठाणे या संस्थेच्या ‘डराव डराव’ या नाटकाला तसेच संस्कृत स्पर्धा नाट्यनिर्मिती प्रथम पारितोषिक रुपये ५० हजार, महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड या संस्थेच्या ‘अक्षगानम’ या नाटकाला तसेच संगीत स्पर्धा नाट्यनिर्मिती प्रथम पारितोषिक रुपये ७५ हजार, देवल स्मारक मंदिर, सांगली या संस्थेच्या ‘संगीत शारदा’ या नाटकाला तसेच हिंदी स्पर्धा नाट्यनिर्मिती प्रथम पारितोषिक रुपये ५० हजार, बेस्ट कला आणि क्रीडा मंडळ मुंबई, या संस्थेच्या ‘महामंत्री’ या नाटकाला देण्यात आले. (प्रतिनिधी)