शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

७०० पोती साखरेची विल्हेवाट लावून चालकाने ट्रक जाळला

By admin | Updated: July 2, 2014 00:49 IST

अमरावती-नागपूर या राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील सत्याग्रही घाटातील ट्रक जळित प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली आहे. ट्रकमधील ६१० पोती साखरेची दुसऱ्या ट्रकने तस्करी करुन चालकाने

ट्रकजळीत प्रकरणाला कलाटणी : साखर घेऊन जाणारा ट्रक ताब्याततळेगाव(श्या.) जि.वर्धा : अमरावती-नागपूर या राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील सत्याग्रही घाटातील ट्रक जळित प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली आहे. ट्रकमधील ६१० पोती साखरेची दुसऱ्या ट्रकने तस्करी करुन चालकाने ट्रक जाळल्याची खळबळजनक बाब तळेगाव (श्या.) पोलिसांनी उघडकीस आणली आहे. याप्रकरणी पोलिसांना संशय येताच ट्रकचालक जसवंतसिंग याची उलटतपासणी करताच या प्रकरणातील धक्कादायक वास्तव पुढे आले. पोलिसांनी लगेच चालकाला ताब्यात घेतले. तसेच ज्या ट्रकने साखरेची विल्हेवाट लावली, तो ट्रकही चालकासह पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे पोलीस सूत्राने सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी एकूण तिघांना ताब्यात घेतल्याचे समजते.पोलीस सूत्रानुसार, परळी बैजनाथ येथून घटनेच्या चार दिवसांपूर्वी ३६ टन साखरेचे ७२० पोते ट्रक सीजी ०७ एए ७६०० ने घेऊन चालक जसवंतसिंग रायपूरकडे निघाला. ५० लाख रुपयांची साखर पाहून त्याच्या मनात घालमेल सुरू झाली. रविवार दि. २९ रोजी दुपारी ट्रक तळेगाव येथे एका ढाब्यावर थांबविला. येथेच त्याने पुढचा कट आखला. नंतर तेथून पुढे तळेगाव-आर्वी मार्गावरील जाम गावाजवळ ट्रक थांबवून ट्रकमधील साखरेचे ६१० पोते दुसऱ्या ट्रकमध्ये (सीजी ०७ टी ७६००) हलविले. उर्वरित ११० पोते साखरेसह त्याने सोमवार दि. ३० च्या मध्यरात्री तळेगावनजीक सत्याग्रही घाटाजवळ ट्रक पेटवून दिला आणि लगतच्या चेअरमन धाब्यावर आश्रय घेतला. प्रथमदर्शनी चालकाने ट्रक जळाल्याचा देखावा केला. इतकेच नव्हे, तर ट्रकमधील ७२० पोती साखर जळाल्याचेही पोलिसांना सांगितले. वास्तविक, सदर ट्रक रायपूरला पोहोचण्यासाठी इतके दिवस लागत नाही. ट्रक पोहचला नाही म्हणून नागपूरच्या काही साखर व्यापाऱ्यांनी तळेगाव ठाणे गाठून तक्रार नोंदविली. याआधारे तळेगाव पोलिसांना संशय येताच चालक जसवंतसिंगची झडती घेतली असता तो पोपटासारखा बोलू लागला. सत्य पुढे येताच तळेगाव पोलिसांनी या मार्गावर नाकाबंदी केली. नागपूरच्या हद्दीतील पारडी नाक्यावर साखर घेऊन जाणाऱ्या ट्रकला चालकासह ताब्यात घेतले.या प्रकरणात मोठे रॅकेट असल्याचा पोलिसांना संशय आहे. या कामात त्याला एका ढाबा चालकाचाही हातभार लागल्याची चर्चा आहे. या प्रकरणातील आरोपींपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने पोलीस तपास सुरू असून पोलिसांनी याबाबत अद्याप अधिकृत खुलासा केलेला नाही. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.(वार्ताहर)