शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

घरात घुसला ट्रक

By admin | Updated: August 12, 2014 01:16 IST

पूर्व नागपुरातील खरबी रिंग रोडवर एक अनियंत्रित ट्रक (टिप्पर) घरात घुसल्याने दोन बहिणी गंभीर जखमी झाल्या. ही घटना सोमवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली. लीना उदाराम पाठराबे

खरबी रिंग रोडवर अनर्थ टळला : दोन बहिणी गंभीरनागपूर : पूर्व नागपुरातील खरबी रिंग रोडवर एक अनियंत्रित ट्रक (टिप्पर) घरात घुसल्याने दोन बहिणी गंभीर जखमी झाल्या. ही घटना सोमवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली. लीना उदाराम पाठराबे (२४) आणि मंजुषा पाठराबे (२५) अशी जखमी बहिणींची नावे आहेत. ६५ वर्षीय उदाराम पाठराबे यांचे खरबी रिंग रोडवरील आॅरेंजनगर येथे प्लॉट आहे. या प्लॉटच्या एका बाजूला पाठराबे यांचे टिनाचे शेड असलेले घर आहे. पाठराबे यांचा मुलगा पंकज मुंबईमध्ये अभियंता आहे. त्यांची पत्नी चंद्रकला काही दिवसांपूर्वीच मुंबईला मुलाकडे गेली. घरी उदाराम आणि त्यांच्या दोन मुली होत्या. सोमवारी सकाळी ५ वाजताच्या सुमारास एम.एच./३०/एल/४८९९ क्रमांकाचा ट्रक खरबी चौकाकडून हनुमान चौकाच्या दिशेने जात होता. अचानक ट्रक अनियंत्रित होऊन रोड डिवायडरला तोडून उजव्या बाजूला वळला. रिंग रोडच्या उजव्या बाजूला पाठराबे यांचे घर होते. घराची सुरक्षा भिंत तोडून ट्रक थेट पाठराबे यांच्या घरात शिरला. घराच्या समोरच्या बाजूला त्यांच्या दोन्ही मुली झोपल्या होत्या. ट्रक भिंत तोडून आत शिरताच भिंतीचा मलबा लीना व मंजुषाच्या अंगावर पडला. पाठराबे आतील खोलीत होते. जोराच्या आवाजासह मलबा अंगावर पडल्याने तिघेही घाबरून गेले. आवाज ऐकून शेजारीही मदतीसाठी धावले. त्यांनी लीना व मंजुषाला तात्काळ जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. ट्रक चालकही भीतीने पळून गेला. नागरिकांनी पोलिसांना सूचना दिली. अपघात इतका भयानक होता की, घरातील कुणी जिवंत असेल असे कुणालाच वाटले नाही. ट्रकच्या रूपात दोन्ही बहिणींचा मृत्यू केवळ एका पावलावर होता. ट्रक आणखी पुढे गेला असता तर दोन्ही बहिणी आणि वडील वाचण्याची शक्यता नव्हती. ट्रकचालक दारूच्या नशेत असल्याची किंवा तांत्रिक बिघाडामुळे ट्रक अनियंत्रित झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. मंजुषाचे नुकतेच लग्न ठरले आहे. ती घरी ट्युशन क्लास चालविते. लीना एलएलएम करीत आहे. अपघातात घरातील सर्व सामान क्षतिग्रस्त झाले आहे. दोन्ही बहिणींचे कॉम्प्युटर आणि अभ्यासाचे साहित्यसुद्धा नष्ट झाले आहे. जवळपास पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)...तर मोठा अनर्थ झाला असता पाठराबे यांच्या प्लॉटच्या समोरून अति उच्च दाबाची वीज लाईन गेली आहे. ट्रक विद्युत पोलच्या बाजूनेच घरात शिरला. जर ट्रक पोलवर आदळला असता विजेच्या तारा तुटल्या असत्या आणि मोठा अनर्थ झाला असता.