शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण येणार अडचणीत

By admin | Updated: July 2, 2014 10:30 IST

आरक्षणाला विरोध करणारा न्या़ बापट आयोगाचा अहवाल विधिमंडळासमोर ठेवणार की नाही, याचे प्रत्युत्तर येत्या २५ जुलैपर्यंत सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला मंगळवारी दिले़

मुंबई : मराठा आरक्षणाला विरोध करणारा न्या़ बापट आयोगाचा अहवाल विधिमंडळासमोर ठेवणार की नाही, याचे प्रत्युत्तर येत्या २५ जुलैपर्यंत सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला मंगळवारी दिले़ मात्र हा अहवाल सरकारने स्वीकारल्यास मोठ्या गाजावाजा करून सरकारने देऊ केलेले मराठा आरक्षण रद्द होऊ शकते.या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते राजाराम खरात यांनी अ‍ॅड़ संघराज रूपवते यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे़ मंडल आयोगावरून वाद झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक राज्याला आरक्षणासाठी आयोग नेमण्याचे आदेश दिले़ त्याचबरोबर एकूण आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक नसावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले़ या आदेशाची अंमलबजावणी करीत राज्य शासनाने वरील कायदा आणला़ त्यानंतर आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी न्या़ बापट यांच्या आयोगाची स्थापना केली़ या आयोगासमोर मराठा आरक्षणाचा प्रमुख मुद्दा होता़ पण आयोगाने मराठा आरक्षणाची आवश्यकता नसल्याचा अहवाल दिला़ हा अहवाल विधिमंडळासमोर ठेवणे अपेक्षित होते़ मात्र शासनाने हा अहवाल विधिमंडळासमोर ठेवला नाही़ तो ठेवण्याचे आदेश न्यायालयाने शासनाला द्यावेत व आरक्षण द्यायचे असल्यास ते कायद्याच्या चौकटीतच दिले गेले पाहिजे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे़न्या़ अभय ओक यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली़ त्यात अ‍ॅड़ रूपवते यांनी न्या़ बापट आयोगाचा अहवाल अद्याप विधिमंडळासमोर ठेवला नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले़ तसेच मध्यंतरी शासनाने हा अहवाल आम्ही स्वीकारला व नाकारलाही नसल्याची भूमिका घेतली होती़ त्यामुळे हा अहवाल विधिमंडळासमोर ठेवण्याचे आदेश न्यायालयाने शासनाला द्यावेत, अशी मागणी अ‍ॅड़ रूपवते यांनी न्यायालयासमोर केली़ ती ग्राह्य धरीत न्यायालयाने वरील आदेश देऊन ही सुनावणी तहकूब केली़ (प्रतिनिधी)