शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींना हवे स्वतंत्र राज्य - पिचड

By admin | Updated: February 14, 2015 04:10 IST

देशभरात अठरा कोटी संख्या असलेला आदिवासी समाज आजही विकासापासून वंचित असून, स्वतंत्र राज्य झाल्याशिवाय विकास होणे शक्य नाही़

नाशिक : देशभरात अठरा कोटी संख्या असलेला आदिवासी समाज आजही विकासापासून वंचित असून, स्वतंत्र राज्य झाल्याशिवाय विकास होणे शक्य नाही़ केंद्र सरकारने आदिवासींसाठी स्वतंत्र राज्याची निर्मिती करण्याची मागणी माजी मंत्री मधुकर पिचड यांनी शुक्रवारी येथे केली़ अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे कालिदास कलामंदिरात आयोजित प्रबोधन मेळाव्यात ते बोलत होते़ थोर स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांना भारतरत्न देण्याची तसेच स्वतंत्र राज्याची निर्मिती न केल्यास देशभर आंदोलनाचा इशाराही त्यांनी यावेळी दिला़व्यासपीठावर आमदार वैभव पिचड, राष्ट्रीय महिला अध्यक्ष ऊर्मीताई मार्को, मणिरामजी मडवी, नामदेव मेश्राम, आऱ यू़ केराम, धनश्याम मडवी, दशरथ मडवी, श्याम वरखडे, सूर्यकांत उईके, नारायण सिडम आदि उपस्थित होते़ पिचड म्हणाले की, आदिवासी ही महान संस्कृती असून, तेच या देशाचे मूळ आहेत़ देशाच्या स्वातंत्र्यासाठी उठाव करून बलिदान देणारा हा समाज असून, दुर्दैवाने या समाजाचा इतिहास लिहिणारे कुणी नव्हते़ या समाजावर सतत अन्याय-अत्याचार होत गेले तसेच त्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले़ आश्रमशाळा, वसतिगृहे यातील विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नसून याविरोधात लढाई करण्यासाठी समाजातील प्रत्येकाने पुढे येण्याची आवश्यकता आहे़ मंत्रिपदाच्या काळात पेसा कायदा मंजूर केला; मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने आंदोलनाची वेळ आली आहे़ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठीच्या वक्तव्याचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला़ तसेच या आरक्षणाबाबत चुकीचा निर्णय घेतल्यास मुंबईकडे जाणारे पाणी अडविण्याचा इशारा त्यांनी दिला़ (प्रतिनिधी)