शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल न वापरता येणे मानसिक त्रासच - ग्राहक मंच

By admin | Updated: July 10, 2015 02:10 IST

मोठ्या हौसेने २२ हजार ८०० रुपये मोजून विकत आणलेला मोबाईल एकही दिवस वापरता न आलेल्या ग्राहकाला ग्राहक मंचात न्याय मिळाला.

विक्रेत्यास दणकापुणे : मोठ्या हौसेने २२ हजार ८०० रुपये मोजून विकत आणलेला मोबाईल एकही दिवस वापरता न आलेल्या ग्राहकाला ग्राहक मंचात न्याय मिळाला. मंचाने विक्री केलेल्या मोबाईल शॉप व सर्व्हिस सेंटरला मोबाईलची मूळ किंमत २२ हजार ८०० रुपये देण्याचा आदेश दिला तसेच एकही दिवस मोबाईल वापरता आला नाही यामुळे साहजिकच मानसिक त्रास झाल्याचे नमूद करीत यापोटी ५ हजार व तक्रारीचा खर्च म्हणून २ हजार, असे एकूण २९ हजार ८०० रुपये देण्याचा आदेश मंचाने दिला आहे. ग्राहक मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात, सदस्य मोहन पाटणकर व क्षितिजा कुलकर्णी यांच्या मंचाने निकाल दिला.या प्रकरणी निखिल विजयकुमार जाधव (रा. बोपोडी) यांनी तक्रार दिली आहे. आराध्या एंटरप्रायझेस (एरंडवणा) हे सर्व्हिस सेंटर व केन्शा मोबाईल शॉप (टिळक स्मारक मंदिरासमोर) या विक्रेत्याच्या विरुद्ध तक्रार दिली होती. विक्रेत्यांनी मोबाईल दुरुस्तही करून दिला नाही किंवा नवीन मोबाईलही दिला नाही. ग्राहक मंचाने यावर नुकसानभरपाईचा आदेश दिला. मोबाईल बदलून दिला नाही> जाधव यांनी केन्शा मोबाईल शॉपमधून २२ हजार ८०० रूपये देऊन मोबाईल विकत घेतला. मात्र, खरेदी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोबाईल बिघडला. त्यामुळे त्यांनी विक्रेत्याकडे तक्रार केली, तेव्हा त्यांनी आराध्या एंटरप्रायझेस येथून मोबाईल बदलून मिळेल, असे सांगितले. > त्या वेळी एंटरप्रायझेसने मोबाईल बदलून न देता तात्पुरती दुरुस्ती केली व मोबाईल परत बिघडल्यास बदलून देण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्याच दिवशी मोबाईल पुन्हा नादुरूस्त झाला तो त्यांनी मोबाईल अ‍ॅक्सेसरीसहित एंटरप्रायझेसकडे नेऊन दिला. त्यांनी मोबाईल मिळाल्याचे पत्रही तक्रारदारांना दिले; मात्र मोबाईल बदलून दिला नाही. त्यामुळे तक्रारदाराने नवा मोबाईल मिळावा म्हणून ग्राहक मंचात तक्रार दाखल केली.