शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

मनोर येथे लवकरच ट्रॉमा सेंटर- आरोग्यमंत्री

By admin | Updated: August 22, 2016 03:35 IST

मनोर येथे ट्रॉमा सेंटरसाठी जागा मिळाली असून तेथे ते सुरू करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी रविवारी येथे दिली.

सुरेश काटे/ आरिफ पटेल,

मनोर/तलासरी- महामार्गावर मनोर येथे ट्रॉमा सेंटरसाठी जागा मिळाली असून तेथे ते सुरू करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी रविवारी येथे दिली. तलासरी ग्रामीण रुग्णालयालाची त्यांनी पाहणी केली. या वेळी अधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयन्त केला परंतु, मंत्री भेटी वेळी ग्रामीण रुग्णालयात उपस्थित असलेल्या पत्रकार व कार्यकर्त्यांनी तलासरी ग्रामीण रुग्णालयाची दयनीय अवस्था त्यांच्या लक्षात आणून दिली या वेळी त्यांनी ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याचे आश्वासन दिले.त्यांच्या समवेत आमदार अमित घोडा, तसेच पालघर जिल्हा शिवसेनेचे उत्तम पिंपळे इत्यादी सह आरोग्य अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते ग्रामीण रुग्णालयाच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते आले असतांना स्थानिक आमदार व खासदार उपस्थित नव्हते.तलासरी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकासह वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने आदिवासी आरोग्य सेवे पासून वंचित राहतात तसेच औषध निर्माण अधिकाऱ्यांसह क्ष किरण तंत्रज्ञ , प्रयोग शाळा तंत्रज्ञ ,इत्यादी महत्वाची पदे रिक्त असल्याने आदिवासी रुग्णांना बाहेरचे महागडे उपचार व तपासण्या कराव्या लागतात शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक १०८ नंबरच्या रुग्ण वाहिन्यांची गरज असल्याने त्यांनी कार्यवाही करण्यास सांगितले. तलासरी शिवसेनेच्यावतीने रुग्णालयाच्या उणीवांबाबत निवेदन दिले. तलासरी ग्रामीण रुग्णालयातील एक्स रे कक्ष , लॅब कक्ष नेहमी बंद असतो पण मंत्र्यांना दाखवण्यासाठी तो उघडा व स्वच्छ ठेवण्यात आला होता.या रुग्णालयात समस्या आहेत पण या बाबत अधिकारी कर्मचाऱ्यांना वरिष्ठांकडून सकारात्मकच बोला अशी तंबीच असल्याने अधिकारी कर्मचार्ऱ्याच्या तोंडावर पट्टीच बांधली होती. रुग्णांची सावंत यांनी आस्थेने विचारपूस केली.>लोकमतमधील वृत्तामुळे मंत्र्यांनी घेतली धावमनोर रुग्णालयात एक्सपायरी डेट होऊन गेलेली औषधे आणली आणि नंतर ती सहा दिवसांनी फेकून दिली असे वृत्त लोकमतने हेडलाईनच्या स्वरुपात प्रसिद्ध केले होते. ते वाचूनच आपण या परिसरातल्या रुग्णालयांच्या पाहणीसाठी धाव घेतली, असे सावंत यांनी सांगितले.