शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

कचराकुंडी नावाला, दोष द्यावा कुणाला?

By admin | Updated: September 3, 2014 00:50 IST

‘स्वच्छ पुणो, सुंदर पुणो’साठी महापालिका दर वर्षी कोटय़वधी रुपयांचा खर्च करीत आहे.

पुणो : ‘स्वच्छ पुणो, सुंदर पुणो’साठी महापालिका दर वर्षी कोटय़वधी  रुपयांचा खर्च करीत आहे. मात्र, महापालिकेच्या या अभियानाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने शहरात घाणीचे साम्राज्य असलेली तब्बल 798 ठिकाणो आढळून आली आहेत. या ठिकाणांमुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य तर धोक्यात आले आहेच; मात्र त्यामुळे शहराच्या विद्रूपीकरणातही भर पडत आहे. एव्हढेच नव्हे, कचरा साठू नये म्हणून महापालिकेकडून विशेष मोहिमा राबविल्या जात असल्या तरी त्याला प्रतिसाद न देता नागरिक पुन्हा त्याच जागी कचरा टाकत आहेत. 
गेल्या दशकभरात शहरातील नागरीकरणामुळे निर्माण होणारा कचराही दुपटीने वाढला आहे. सध्या दररोज सुमारे 1,6क्क् टन कचरा निर्माण होतो. या कच:याचे संकलन महापालिकेकडून दररोज केले जाते. त्यासाठी सुमारे 4क्क्हून अधिक कंटेनर  ठेवण्यात आलेले आहेत. त्याच्या माध्यमातून सुका कचरा आणि महापालिकेच्या घंटा गाडीच्या माध्यमातून ओला कचरा संकलित केला जातो. मात्र, अद्यापही शहरातील 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरात तब्बल 798 अशी ठिकाणी आहेत, जेथे नागरिकांकडून कचराकुंडी नसतानाही कचरा टाकला जात आहे. त्यात प्रामुख्याने रिकाम्या जागा, प्रमुख चौकांचे कोपरे, कचराकुंडी असतानाही आसपासचा असणारा परिसर या जागांचा समावेश आहे.महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी दोन आठवडय़ांपूर्वी घनकचरा विभागाची बैठक घेऊन शहरात कचरा साठत असलेली तसेच घाणीचे साम्राज्य असलेली ठिकाणो शोधून त्यांचा क्षेत्रीय कार्यालयनिहाय अहवाल ठेवण्याच्या सूचना 
दिल्या होता. हा अहवाल तयार करण्यात आला असून, त्यात या ठिकाणांची माहिती देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
 
आयुक्तांनी दिलेल्या क्षेत्रीय कार्यालयांनी सादर केलेल्या अहवालात प्रामुख्याने रिकाम्या जागांचा समावेश आहे. या ठिकाणी रात्री-अपरात्री कचरा टाकला जातो. ही ठिकाणो माहीत झाली आहेत. त्यांची संख्या मोठी असल्याने त्यांची क्रमवारी ठरविण्यात येणार आहे. या ठिकाणी कचरा टाकला जाणार नाही. यासाठी लवकरच कृती आराखडा तयार केला जाणार आहे. तसेच, येत्या सहा महिन्यांत या सर्व जागा स्वच्छ केल्या जातील.
- सुरेश जगताप, घनकचरा विभागप्रमुख
 
येरवडा आघाडीवर 
क्षेत्रीय कार्यालयांच्या सर्वेक्षणानुसार, येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कचरा साठणा:या सर्वाधिक 1क्7 जागा आहेत. 79 जागा भवानी पेठ हद्दीत असून, 73 जागा कोंढवा- वानवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या   हद्दीत आहेत. तर सर्वात कमी 15 ठिकाणो टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत असून, 24 ठिकाणो कसबा-विश्रमबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आहेत.
 
शहरात घाणीच्या साम्राज्यामुळे सार्वजनिक आरोग्याची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. प्रामुख्याने झोपडपट्टय़ांमध्ये साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले असून, मोकाट कुत्र्यांचे प्रमाणही वाढले आहे. या मोकाट कुत्र्यांचा त्रस वाहनचालक, ज्येष्ठ नागरिक तसेच शाळेमध्ये जाणा:या विद्याथ्र्याना सहन करावा लागत असून कुत्र चावण्याच्या घटनाही वाढत आहेत.
 
कारवाई केवळ कागदावर..
कच:याबाबत पालिकेकडून शहर स्वच्छता अभियान राबविले जात आहे. त्याद्वारे वर्गीकरण वाढवून नागरिकांनी कचरा बाहेर न टाकता पालिकेच्या यंत्रणोकडे द्यावा, त्यासाठी घंटागाडय़ांची सोयही करण्यात आली आहे. त्यामुळे शक्य त्या ठिकाणचे कंटेनर पालिकेने काढून घेतले आहेत. मात्र, त्याबाबत पुरेशा जनजागृतीअभावी नागरिक अजूनही कंटेनर नसलेल्या ठिकाणीच कचरा टाकतात. कचरा टाकू नये म्हणून पालिकेकडून कार्मचारीही त्या ठिकाणी 
ठेवले तरी काहीच कारवाई होत नाही.
 
4क्षेत्रीय कार्यालयांनी सादर केलेल्या अहवालात सुमारे 30 टक्के ठिकाणो ही कचराकुंडय़ा असणारी आहेत. 
या ठिकाणी जास्त जागा असल्याने नागरिक कचरा कुंडीत न टाकता परिसरात टाकतात. त्यामुळे कर्मचारीही केवळ कुंडीमधील कचरा उचलतात आणि इतर कचरा तसाच पडून राहून घाण निर्माण होते.
 
टिळक रस्ता15
कसबा-विश्रमबाग24 
धनकवडी25 
घोले रस्ता39 
कोथरूड39 
वारजे- कर्वेनगर47 
औंध47 
हडपसर56 
नगर स्ता58 
ढोले-पाटील रस्ता59 
सहकारनगर66
कोंढवा- वानवडी73 
भवानी पेठ79 
येरवडा1क्7