शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वेची वाहतूक चार तास ठप्प

By admin | Updated: July 11, 2016 05:37 IST

मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीच्या इंजिनची चाके रविवारी सकाळी तळगाव येथे जाम होऊन इंजिन बंद पडले.

कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) : मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीच्या इंजिनची चाके रविवारी सकाळी तळगाव येथे जाम होऊन इंजिन बंद पडले. त्यामुळे कोकण रेल्वेवरील वाहतूक सुमारे चार तास पूर्णपणे ठप्प होती. प्रत्येक स्थानकात विविध रेल्वेगाड्या उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.रविवारी सकाळी मालगाडी कुडाळ व ओरोस या रेल्वेस्थानकांच्या दरम्यान असलेल्या तळगाव स्थानक येथे आली असता, या गाडीच्या इंजिनाची चाके जाम झाली. त्यामुळे इंजिनात बिघाड होऊन ही गाडी तळगाव येथील पटरीवरच अडकून पडली. त्यामुळे मुंबईहून गोव्याच्या दिशेने येणारी कोकणकन्या एक्स्प्रेस कणकवली येथे थांबविण्यात आली होती, तर ओरोस येथे होखा एक्स्प्रेस, नांदगाव येथे राज्यराणी एक्स्प्रेस, तसेच गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी नेत्रावती एक्स्प्रेस कुडाळ स्थानकात, दिवा गाडी सावंतवाडी येथे, तर मंगलोर एक्स्प्रेस कणकवली स्थानकावर थांबविण्यात आली होती. या घटनेमुळे दिवा व नेत्रावती एक्स्पे्रस सुमारे तीन तास उशिराने धावत होती. अखेर बंद पडलेल्या मालगाडीला होखा एक्स्प्रेसचे इंजिन जोडण्यात आले व सुमारे चार तासानंतर ही गाडी ओरोस येथे रेल्वेस्थानकात आणण्यात आली. त्यानंतर, या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. (प्रतिनिधी)