शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

ससून डॉकचा कायापालट

By admin | Updated: July 29, 2016 01:54 IST

मुंबईतील ससून डॉकचा संपूर्ण कायापालट करणाऱ्या योजनेला मंजुरी देण्यात आली असून न्यू यॉर्कमधील फुलटॉन मत्स्य बाजाराच्या धर्तीवर या ठिकाणी बाजाराची उभारणी केली

- यदु जोशी, मुंबई

मुंबईतील ससून डॉकचा संपूर्ण कायापालट करणाऱ्या योजनेला मंजुरी देण्यात आली असून न्यू यॉर्कमधील फुलटॉन मत्स्य बाजाराच्या धर्तीवर या ठिकाणी बाजाराची उभारणी केली जाणार आहे. जगातील सर्वात सुंदर अशा सिडने बंदराप्रमाणे आता ससून डॉकचे रुपडे पालटणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत ५२ कोटी १७ लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. १८७१ मध्ये अस्तित्वात आलेल्या ससून डॉकचे आधुनिकीकरण करताना त्याचा विकास एक पर्यटनस्थळ म्हणून देखील करण्यात येणार आहे. सध्याच्या मत्स्य लिलाव शेडचे नूतनीकरण, जेटीचे सक्षमीकरण, जोड मार्ग व अंतर्गत रस्ते सुधारणा, वीजपुरवठा सुधारणा, वनिकरण, टॉक्झिक वेस्ट संकलन केंद्र, नवीन इमारतीत पाईपलाईन टाकणे, कार्यशाळा, सुरक्षागृह, सीसीटीव्ही कॅमेरे, संरक्षक भिंत, सौंदर्यीकरण, अग्निशमन यंत्रणेचे आधुनिकीकरण, मलनि:स्सारण व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. विद्यमान सर्व्हिस ब्लॉक्सचे रुपांतर आधुनिक बंदर व्यवस्थापन व मेनेन्स ब्लॉकमध्ये केले जाईल. मासेमारांसाठी आरामगृह उभारण्यात येणार आहे. मच्छिमार विकास मंडळातर्फे विकास- व्हिक्टोरिया बेसिनची दुरुस्ती, रेडिओ कम्युनिकेशन यंत्रणा उभारणे ही कामेही करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र मच्छिमार विकास महामंडळामार्फत हा आधुनिकीकरण प्रकल्प राबविण्यात येणार आहे. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी ससून डॉकच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते.