शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की

By admin | Updated: September 22, 2016 03:26 IST

गणेश विसर्जनादरम्यान कल्याण पूर्वेत एका पोलीस उपनिरीक्षकाला बुडवून मारण्याचा प्रयत्न झाला होता

कल्याण : गणेश विसर्जनादरम्यान कल्याण पूर्वेत एका पोलीस उपनिरीक्षकाला बुडवून मारण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर, आता डोंबिवलीत एका वाहतूक पोलिसाला टेम्पोचालकाने शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरून टेम्पोचालक मशीद अहमद शरीफ खान याला अटक करण्यात आली आहे. डोंबिवली पूर्वेतील शीळ मार्गावरील मानपाडा चौक येथून मशीद खान टेम्पो नेत होता. त्याने सीटबेल्ट लावला नव्हता. तसेच तो भरधाव टेम्पो चालवत होता. या वेळी तेथे तैनात असलेले कोळसेवाडी वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार दिगंबर पवार आणि त्यांचा सहकारी ट्रॅफिक वार्डन रणजित परदेशी यांच्या हा प्रकार निदर्शसनास येताच त्यांनी टेम्पो थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मशीदने टेम्पो थांबवला नाही. पवार यांनी तत्काळ पाठलाग करीत टेम्पो थांबवला. त्याच्याकडे कागदपत्रे आणि परवान्याची मागणी केली. त्याचा राग आल्याने मशीदने पवार यांच्याशी वाद घालत त्यांना शिवीगाळ केली. (प्रतिनिधी)