शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

विषारी जेली फिश आक्सा किनाऱ्यावर

By admin | Updated: August 24, 2015 00:56 IST

समुद्राच्या वाहत्या पाण्याबरोबर आज आक्सा समुद्रकिनारी निळ्या रंगाचे विषारी जेली फिश आल्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये घबराट पसरली आहे

मुंबई : समुद्राच्या वाहत्या पाण्याबरोबर आज आक्सा समुद्रकिनारी निळ्या रंगाचे विषारी जेली फिश आल्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये घबराट पसरली आहे. आक्सा बीचवर ३-४ पर्यटकांना आणि जीवरक्षक सचिन मुळीक यांना जेली फिशने डंख मारला आहे, अशी माहिती पलिकेचे निवृत जीवरक्षक रजनीकांत माशेलकर यांनी दिली.दरवर्षी पाऊस पडल्यावर जेलीफिश मुंबईच्या समुद्रकिनारी येतात. मात्र यंदा समाधानकारक पाऊस पडला नसल्याने जेली फिशचे आगमन तसे उशिराच झाले. समुद्राच्या पाण्याचा रंग निळा आणि जेली फिश हादेखील निळ्या रंगाचा असल्यामुळे पर्यटकांना तो दिसत नाही. मात्र त्याने डंख मारल्यावर त्याची दाहकता लक्षात येते. निळ्या रंगाचा फुग्याच्या आकाराच्याा असणाऱ्या या जेली फिशला एक छोटा आणि एक मोठा दोरा असतो. जेली फिशने पायाला, गुप्तांगावर आणि हाताला डंख मारल्यास काखेत गाठ येते, असे माशेलकर म्हणाले. आज ते निवृतीनंतरदेखील सामजिक बांधिलकी म्हणून आक्सा समुद्रकिनारी गस्त घालतात.समुद्रकिनाऱ्यावर आल्यावर जेली फिशचे अर्धे आयुष्य संपलेले असते. मात्र तरी त्याचा डंख असह्य असतो. सुमारे एक तास त्याच्या डंखाचा परिणाम राहतो. जेली फिशने डंख मारल्यास जखमेच्या जागी लिंबू, शेण लावल्यास त्याची दाहकता काही प्रमाणात कमी होते, अशी माहिती माशेलकर यांनी दिली. (प्रतिनिधी)