शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याला मिळाला पर्यटनस्थळाचा दर्जा

By admin | Updated: August 22, 2016 03:38 IST

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानास लागून असलेला घोडबंदर किल्ला पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) बैठकीत चर्चा झाली

 ठाणे : ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानास लागून असलेला घोडबंदर किल्ला पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) बैठकीत चर्चा झाली. आयत्या वेळच्या विषयांवरील चर्चेच्या वेळी घोडबंदरला पर्यटनस्थळ, तर शहापूरचे सातगाव, नवले कपिलेश्वरला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठीचा ठराव पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.वन विभागाच्या जमिनीवर व पुरातत्त्व विभागाच्या नियंत्रणात असलेल्या घोडबंदर किल्ल्याला मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील पर्यटकांकडून मोठी पसंती आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी या किल्ल्याच्या परिसर सुशोभीकरणासाठी सुमारे पाच लाख रुपयेही डीपीसीने मंजूर केले होते. मात्र, वन विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे तो खर्च करता आला नसल्याची खंत आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्तकेली. मागील सुमारे सात वर्षांपासून या किल्ल्यासाठी सरनाईक प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नास अनुसरून शिंदे यांनी या किल्ल्यास पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निदर्शनास आणून दिले.वन खात्याच्या सुमारे २० एकरच्या परिसरात हा किल्ला पुरातन विभागाच्या अखत्यारित आहे. त्यांच्या संमतीशिवाय तेथे कोणत्याही प्रकारची दुरुस्ती किंवा डागडुजी करता येत नसल्याचा याआधीचा अनुभव आहे. यामुळे महसूल विभागाने ५०० मीटर जागा सुशोभीकरणासाठी मीरा-भार्इंदर महापालिकेला हस्तांतरित करण्याची मागणी सरनाईक यांनी लावून धरली. या विषयावरील चर्चेदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिका यांच्या संयुक्त प्रयत्नातून किल्ल्याचा परिसर सुशोभीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी स्पष्ट केले. त्यानंतर, या किल्ल्याचा ठरावही घेण्यात आला. (प्रतिनिधी)जिल्ह्यात २७ ठिकाणी पर्यटनस्थळे घोषित करायची आहेत. त्यापैकी आठ प्रस्ताव आले असता त्यांना पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा या वेळी ठराव घेण्यात आला आहे. जिल्हाभरातील या स्थळांच्या ठिकाणी सोयीसुविधा, डागडुजी व दुरुस्तीसाठी वर्षभरात सुमारे सात ते आठ कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यातून हा खर्च केला जातो.