शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

तूरखरेदी होणार डिजिटल

By admin | Updated: July 16, 2017 00:53 IST

गत हंगामात तूर खरेदीवरुन झालेला घोळ लक्षात घेऊन राज्य सरकार आता तूर खरेदी केंद्रांवर डिजिटल नोंदणीची सुविधा करणार आहे. त्यामुळे नोंदविलेल्या दिवशी

- लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गत हंगामात तूर खरेदीवरुन झालेला घोळ लक्षात घेऊन राज्य सरकार आता तूर खरेदी केंद्रांवर डिजिटल नोंदणीची सुविधा करणार आहे. त्यामुळे नोंदविलेल्या दिवशी शेतकऱ्यांना तूरखरेदीची हमी मिळणार आहे. तसेच एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर तूर येणे टळणार असून, उघड्यावर तूर ठेवण्याची वेळ देखील उत्पादकांवर येणार नाही. राज्याच्या कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार यांनी ही माहिती शनिवारी पत्रकारांना दिली. पणन विभागाच्या माध्यमातून खरेदी केंद्रावर ‘ई’ तूर खरेदी नोंदणीची सुविधा देण्यात येणार असून, त्याची संगणक प्रणाली देखील तयार करण्यात आली आहे. या प्रणालीला तूर उत्पादकांचे आधारक्रमांक जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे या पुढील काळात तूरक्षेत्र आणि उत्पादकांची यादी तयार होण्यास मदत होईल. या शिवाय तूरीचे अचूूक क्षेत्र देखील समजेल, असे त्यांनी सांगितले. यंदा ७ जुलै अखेर राज्यात ७ लाख ४३ हजार हेक्टरवर तूरीची पेरणी झाली होती. हे प्रमाण सरासरीच्या ६१ टक्के इतके आहे. त्यामुळे यंदा देखील तूरीचे उत्पादन चांगले येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय शेतकऱ्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल, असेही विजय कुमार म्हणाले.तूर निर्यातीला परवानगी द्याराज्यात साडेसहा लाख टन तूरडाळ शिल्लक आहे. त्यामुळे त्याचा सरकारने बफरस्टॉक (साठा) करावा. तीन वर्षे हा साठा चांगल्यापद्धतीने राखता येऊ शकतो. त्याचबरोबर यंदा निर्यातीला देखील केंद्र सरकारने परवानगी दिली पाहिजे. तसा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविला आहे. - विजय कुमार, प्रधान सचिव-कृषी विभाग