शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

बेस्ट संकटावरील उताराच अडचणीत

By admin | Updated: April 4, 2017 03:01 IST

आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी बेस्ट उपक्रमाला महापालिकेने हात देण्याचे कबूल केल्यामुळे कृती आराखडा प्रशासनाने तयार केला

मुंबई : आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी बेस्ट उपक्रमाला महापालिकेने हात देण्याचे कबूल केल्यामुळे कृती आराखडा प्रशासनाने तयार केला आहे. मात्र यामध्ये महापालिकेने सुचविलेली स्वेच्छानिृवत्ती, बसगाड्या कमी करणे आणि बेस्ट भाडेवाढ अशा जालीम उपायांचा समावेश आहे. त्यामुळे हा आराखडा अमलात येण्यापूर्वीच अडचणीत येणार आहे.कोट्यवधी रुपयांच्या तुटीत असलेल्या बेस्ट उपक्रमाला टाळे लागण्याची वेळ आली आहे. या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी बेस्टने अखेर महापालिकेपुढे हात पसरले आहेत. पालिका प्रशासनानेही या सार्वजनिक उपक्रमाच्या पालकत्वाची जबाबदारी घेतली आहे. मात्र आर्थिक मदतीपूर्वी यावर बेस्टकडून अहवाल मागविण्यात आला होता. हा अहवाल तयार असून गुरुवारी बेस्ट समितीच्या बैठकीत यावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.यामध्ये बसभाड्यात दोन ते चार रुपयांमध्ये वाढ, पांढरा हत्ती ठरणाऱ्या वातानुकूलित २८४ बसगाड्या बंद करणे, वाहनचालक व वाहक वगळता नोकर भरती बंद आणि स्वेच्छा अथवा सक्तीची निवृत्ती असे उपाय या अहवालातून पुढे आले आहेत. मात्र कामगार कपातीला कामगार संघटनांकडून तीव्र विरोध होणार हे निश्चित आहे. तसेच भाडेवाढ बेस्टलाच घातक ठरू शकते. त्यामुळे या शिफारशींवर आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)वातानुकूलित बसगाड्या बंदवातानुकूलित बसगाड्या बेस्टसाठी केवळ पांढरा हत्तीच ठरल्या आहेत. या बसगाड्यांच्या उत्पन्नापेक्षा त्यावरील खर्चच अधिक आहे. दरवर्षी या सेवेतून बेस्ट उपक्रमाचे ८२ कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. ही बाब वारंवार निदर्शनास आणूनही केवळ प्रतिष्ठेसाठी बेस्टने या बसगाड्या बंद केल्या नाहीत. यामुळे आर्थिक तूट वाढत गेली. आता या २८४ वातानुकूलित बसगाड्यांची सेवा बंद करण्याचा निर्णय उपक्रमाने घेतला आहे.भाडेवाढ म्हणजे पायावर धोंडा : बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमधून पाच ते सात वर्षांपूर्वी ४२ लाख प्रवासी प्रवास करत होते. ही संख्या आता २९ लाखांवर आली आहे. दोन वर्षांपूर्वीच बेस्ट उपक्रमाने तीन वेळा भाडेवाढ केली होती. त्यातच मेट्रो रेल्वेचे जाळे वाढत आहे. शेअर रिक्षा-टॅक्सीचे आव्हान, ओला व उबेरची स्पर्धा यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येवर परिणाम होत आहे. अशात आणखी भाडेवाढ बेस्ट उपक्रमाला मुंबईकरांपासून तोडू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. सध्या तिकिटांचा किमान दर आठ रुपये आहे, तो दहा रुपये करण्याचे प्रस्तावित आहे. वातानुकूलित बसगाड्यांचा सोस सुटत नाहीवातानुकूलित बसगाड्या बंद करण्याचे ठरविले तरी अद्याप या बसगाड्यांचा बेस्टचा सोस काही सुटलेला नाही. त्यामुळे २५ कोटी खर्च करून वातानुकूलित मिनी बसगाड्या खरेदी करणे प्रस्तावित आहे.या वर्षभरात १५८७ कामगार निवृत्त होणार आहेत. मात्र वाहनचालक व वाहक वगळता नोकरभरती करण्यात येणार नाही.