शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटोपाठोपाठ कांद्यानेही रडविले!

By admin | Updated: August 29, 2016 03:31 IST

निकृष्ट बियानांमुळे टोमॅटो हंगाम हातातून गेल्यानंतर आर्थिक गर्तेत सापडलेल्या बळीराजाला कांदापिक तरी वर काढेल, अशा आशेवर बसलेल्या उत्पादकांच्या डोळयात सध्या कांद्याने पाणी आणले आहे.

ओझर / निरगुडसर : निकृष्ट बियानांमुळे टोमॅटो हंगाम हातातून गेल्यानंतर आर्थिक गर्तेत सापडलेल्या बळीराजाला कांदापिक तरी वर काढेल, अशा आशेवर बसलेल्या उत्पादकांच्या डोळयात सध्या कांद्याने पाणी आणले आहे. किलोला ५ ते ७ रुपये इतका कमी बाजारभाव मिळत असल्याने त्यातून भांडवलही निघत नसल्याने आता कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात कांदापिक मोठ्या प्रमाणावर घेतले होते़ त्यामध्ये आंबेगाव तालुक्यासह शिरूर, खेड, जुन्नर या तालुक्यांचाही समावेश आहे़ कांदा उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी ३५ ते ४० हजार रुपये एकरी खर्च करून शेतात कांदापिक घेतले होते़ पोषक हवामानामुळे उत्पादनही चांगल्या प्रमाणात झाले़ त्या वेळी कांद्याला ७० ते ८० रुपये दहा किलोसाठी बाजारभाव मिळत होता़ हा बाजारभाव केलेल्या खर्चाच्या प्रमाणात शेतकऱ्यांना परवडणारा नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांनी भविष्यात चांगला बाजारभाव मिळेल, या आशेने कांदाचाळी बांधून कांद्याची साठवणूक केली़ लाखो रुपये खर्च करून कांदाचाळी बांधल्या, कांद्याचे भांडवल अधिक कांदाचाळींचा खर्च, मंजुरी सर्व खर्च अंगावर पडून आहे. शासनाकडून मिळणाऱ्या कांदाचाळींचे अनुदानदेखील मिळालेले नाही़ त्यामुळे कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे़ कांदापिकासाठी बँका, सोसायट्या यांचे कर्ज काढून केलेला भांडवली खर्चदेखील सध्याच्या दरात वसूल होत नाही. पाच महिने बराकीत कांदा साठवून ठेवला. त्यामधील बराचसा कांदा सडला, वजन घट झाली. तरीही कांद्याचे दर वाढतच नसल्यामुळे खर्च केलेले भांडवलदेखील सध्या वसूल होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा अधिकच वाढला आहे. उन्हाळी हंगामात टोमॅटोची पिके घेतली. परंतु या पिकाला करपा, बोकड्या या रोगाच्या प्रादुर्भावामुळे टोमॅटोचा भांडवली खर्चदेखील वसूल झाला नाही. (प्रतिनिधी)भाव आणखी कमी होणारया वर्षी कांद्याचे दर वाढण्याची शक्यता धूसर असल्याची शक्यता ओतूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे अडतदार प्रदीप मुरादे, धनेश संचेती (जुन्नर) यांनी सांगितले. साठवणगृहात सडत चाललेला कांदा, तसेच भविष्यात कांद्याचे दर वाढणार नाहीत, या शक्यतेने भीतीपोटी जुन्नर, ओतूर, तसेच ओतूर येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यामुळे कांद्याचे दर अधिक ढासळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सरकारने कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांच्या अडतीचा तिढा निर्माण केल्यामुळे अडतदार व्यापारी व शेतमाल खरेदीदार व्यापारी यांच्यामधील साट्यालोट्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाची विक्री कचरामोल भावात होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याची खंत पिंपळगाव सिद्धनाथ येथील प्रगतिशील शेतकरी संदेश खंडागळे, संतोष खंडागळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.