शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

टोलवसुली लांबणीवर

By admin | Updated: August 11, 2015 23:51 IST

कृती समितीचा वॉच : न्यायालयात जाण्यासाठी कागदपत्रांचीच जुळवाजुळव

सांगली : सांगलीतील टोलवसुली आता पोलीस व कृती समितीच्या विनंतीमुळे लांबणीवर गेली आहे. टोलबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, टोल कर्मचाऱ्यांनी दररोज टोल नाक्यावर हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे उच्च न्यायालयातील याचिकेबाबत अद्याप शासनस्तरावर कागदपत्रांचीच जुळवाजुळव सुरू आहे. त्यामुळे अद्याप याचिका दाखल होऊ शकलेली नाही. सांगलीतील टोलसाठी कंपनीने केलेल्या दरखास्तीसंदर्भात न्यायालयाने आठवड्यापूर्वी निकाल दिला होता. त्यानुसार कंपनीला वाढीव खर्चासाठी १६ वर्षे टोल वसुली करता येणार आहे. वरिष्ठ न्यायालयात याबाबत दाद मागणार असल्याने, न्यायालयाने या निकालास स्थगिती द्यावी, अशी मागणी सरकारच्यावतीने जिल्हा न्यायालयात करण्यात आली होती. न्यायालयाने शासनाचा अर्ज फेटाळला. त्यामुळे आता कंपनीने टोल वसुलीसाठीची तयारी पूर्ण केली आहे. एकीकडे कंपनीने टोलवसुली सुरू करण्याची तयारी केली आहे, तर दुसरीकडे टोलविरोधी सर्वपक्षीय कृती समितीने आंदोलनाची तयारी केली आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील तसेच स्थानिक पोलिसांनी अशोका बिल्डकॉन कंपनीला टोलवसुलीबाबत घाई न करण्याची विनंती केली होती. त्यामुळे टोलवसुली लांबणीवर पडली आहे. कंपनीचे कर्मचारी मात्र दररोज या ठिकाणी येत असल्यामुळे केव्हाही टोल सुरू होऊ शकतो, अशी शंका सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीला वाटत आहे. त्यामुळे समितीचे कार्यकर्ते दररोज टोल नाक्यावर ‘वॉच’ ठेवून आहेत. मंगळवारीही दुपारपर्यंत कार्यकर्ते  ठाण मांडून होते. समितीचे निमंत्रक सतीश साखळकर, माजी आमदार नितीन शिंदे, नगरसेवक प्रशांत पाटील-मजलेकर, शिवसेनेचे अजिंक्य पाटील, अनिल शेटे, आदी उपस्थित होते. टोलवसुली अद्याप सुरू नसल्याने आंदोलनकर्त्यांनी आंदोलन करू नये, अशी विनंती अतिरिक्त पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांनी केल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलन स्थगित केले आहे. अशोका बिल्डकॉन कंपनीचे टोल कर्मचारी दिवसभर नाक्यावर थांबून होते. टोल वसुलीबाबतची सर्व तयारी कंपनीने पूर्ण केली आहे, मात्र वसुलीला त्यांनी सुरुवात केलेली नाही. पोलिसांनी त्यांनाही कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे घाई न करण्याची सूचना दिली. त्यामुळे टोलवसुली लांबणीवर गेली आहे. जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची तयारी अद्याप पूर्ण झालेली नाही. कागदोपत्री सर्व पुरावे घेऊन सक्षमपणे याचिका दाखल केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कॅश फ्लो सादर केला नाहीसार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शेजाळ यांनी सांगितले की, कॅश फ्लो अद्याप सादर केलेला नाही. शासनाच्यावतीने सध्या उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे कॅश फ्लोबाबत कोणतीही प्रक्रिया झालेली नाही. दुसरीकडे कंपनीकडूनही अद्याप वसुलीबाबत कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. शासनाला न्यायालयाने अधिसूचना प्रसिद्धीचे आदेश दिले होते. मात्र, शासनस्तरावरून अधिसूचनेबाबतही हालचाली नाहीत. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनीच प्रथम उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सांगितल्याने अधिसूचनेचा निर्णयही नंतर होण्याची चिन्हे आहेत.