शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून मेल-एक्स्प्रेसचे नवे वेळापत्रक

By admin | Updated: October 1, 2016 02:50 IST

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार १ आॅक्टोबरपासून प्रवाशांच्या सोयिनुसार मेल-एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात येत असल्याची माहिती पश्चिम व मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

मुंबई : रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार १ आॅक्टोबरपासून प्रवाशांच्या सोयिनुसार मेल-एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात येत असल्याची माहिती पश्चिम व मध्य रेल्वेकडून देण्यात आली. त्याचप्रमाणे नवीन ट्रेनही चालवण्यात येणार असून यामध्ये पश्चिम रेल्वेवर अंत्योदय, उदय, हमसफर आणि संकल्प ट्रेन तर मध्य रेल्वेवर सीएसटी ते करमाळी दरम्यान वेगवान अशी तेजस ट्रेन चालवण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर दादर ते डहाणू दरम्यान १४ डेमूऐवजी लोकल चालवण्यात येतील,अशी माहिती देण्यात आली. मध्य रेल्वेवरील सीएसटी ते करमाळी तेजस एक्सप्रेस ही आठवड्यातून पाच दिवस धावेल. ट्रेन नंबर ११२0९ सीएसटी येथून 00.२0 वाजता सुटून करमाळी येथे ११.00 वाजता पोहोचेल. तर ट्रेन नंबर ११२१0 करमाळी येथून १२.२0 वाजता सुटून सीएसटी येथे त्याच दिवशी २२.४५ वाजता पोहोचणार आहे. ट्रेनला ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ, थिविम येथे थांबा देण्यात येईल. त्याचप्रमाणे मनमाड-सीएसटी पंचवटी एक्सप्रेस ६.१0 च्या ऐवजी ६.0२ वाजता सुटेल. एलटीटी-भुवनेश्वर आणि सीएसटी ते लातूर एक्सप्रेसला ठाणे स्थानकातही थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)