शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आज मध्य, हार्बरवर ‘मेगा’ तर पश्चिम रेल्वेमार्गावर ‘जम्बो’ ब्लॉक

By admin | Updated: May 28, 2017 01:46 IST

रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसह सिग्नलमधील तांत्रिक दोष दूर करणे, रुळांमधील खडी बदलणे या कामांसाठी रेल्वेच्या मध्य, हार्बर मार्गावर ‘मेगा’ तर पश्चिम मार्गावर ‘जम्बो’ ब्लॉक घेण्यात

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसह सिग्नलमधील तांत्रिक दोष दूर करणे, रुळांमधील खडी बदलणे या कामांसाठी रेल्वेच्या मध्य, हार्बर मार्गावर ‘मेगा’ तर पश्चिम मार्गावर ‘जम्बो’ ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यानुसार मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा धिम्या मार्गावर, हार्बर सीएसएमटी ते चुनाभट्टी-वांद्रे स्थानकांंवर अप-डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. तर पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान अप-डाऊन मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर सकाळी १०.५८ ते दुपारी ४.०३ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. परिणामी सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार स्थानकांवर थांबणार नसल्याने प्रवाशांना भांडुप, विक्रोळी व कुर्लामार्गे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत दुरु स्तीसाठी लोकल बंद ठेवण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी ठरावीक अंतराने पनवेल ते कुर्ला विशेष लोकल चालवण्यात येणार आहे. हार्बरच्या प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पश्चिम व मध्य रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी जलद मार्गावरील लोकल सेवा धिम्या मार्गाने सुरू राहणार आहेत. मात्र काही लोकल रद्द करण्यात येणार असून १०-१५ मिनिटे उशिराने लोकल धावणार आहेत.