शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून ‘मेक इन इंडिया’

By admin | Updated: February 13, 2016 04:00 IST

देशाच्या उद्योग क्षेत्राला नवी झळाळी देण्याच्या उद्देशाने मुंबईत आयोजित केलेल्या मेक इन इंडिया सप्ताहाचे उद्घाटन शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. १८ तारखेपर्यंत

मुंबई : देशाच्या उद्योग क्षेत्राला नवी झळाळी देण्याच्या उद्देशाने मुंबईत आयोजित केलेल्या मेक इन इंडिया सप्ताहाचे उद्घाटन शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. १८ तारखेपर्यंत चालणाऱ्या या सप्ताहात महाराष्ट्रासह विविध राज्यांतील उद्योगांसंबंधीची चर्चासत्रे, गुंतवणुकीसंबंधीचे करार, प्रदर्शने असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.या सप्ताहाचे मुख्य केंद्र असलेल्या बीकेसी मैदानावर पंतप्रधान मोदी सकाळी ११.३०ला भेट देतील. तेथे औपचारिक उद्घाटन केल्यानंतर ते विविध राज्यांच्या स्टॉल्सना भेट देतील; तसेच जगातील नामवंत कंपन्या, पंतप्रधान, मंत्र्यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळांशी चर्चा करतील. सायंकाळी ५ वाजता वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब आॅफ इंडियामध्ये सप्ताहाच्या उद्घाटनाचा मुख्य समारंभ होणार आहे. स्वीडनचे पंतप्रधान केजेल लॉफव्हेन, फिनलँडचे पंतप्रधान जुहा पेट्री सिपिला, लिथुआनियाचे पंतप्रधान अलगिर्डास बटकॅविसियस यांच्या मुख्य उपस्थितीत हा समारंभ होईल. राज्यपाल चे विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री निर्मला सीतारामन हे प्रमुख पाहुणे असतील. रात्री ८ला मुख्यमंत्री फडणवीस यांनी महालक्ष्मी टर्फ क्लबवर पंतप्रधान आणि सप्ताहानिमित्त येत असलेल्या मान्यवर प्रतिनिधींसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. बीकेसीमध्ये शनिवारी स्वीडन मेकस् इन इंडिया आणि जर्मनीची गुंतवणूक अशा दोन विषयांवर चर्चासत्रे आणि सीएनएन बिझनेस एशिया फोरमचा कार्यक्रम होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांची पाहणीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बीकेसी, एनएससीआय, महालक्ष्मी टर्फ क्लब आणि गिरगाव चौपाटीला भेट देऊन पाहणी केली.