शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालय प्रवेशाचा आज शेवटचा दिवस

By admin | Updated: June 30, 2016 00:45 IST

अकरावी प्रवेशासाठी जाहीर झालेल्या पहिल्या गुणवत्ता यादीतील सुमारे ५० टक्के विद्यार्थ्यांनी अद्याप महाविद्यालयांत जाऊन प्रवेश निश्चित

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 30 - अकरावी प्रवेशासाठी जाहीर झालेल्या पहिल्या गुणवत्ता यादीतील सुमारे ५० टक्के विद्यार्थ्यांनी अद्याप महाविद्यालयांत जाऊन प्रवेश निश्चित केला नसल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली आहे. अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत पहिल्या यादीत प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत जाऊन प्रवेश निश्चित करण्यासाठी गुरूवारी शेवटचा दिवस आहे. प्रवेश निश्चित न करणारे विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेबाहेर पडतील, असेही कार्यालयाने स्पष्ट केले.याआधी अकरावीची पहिली गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर झाली होती. त्यात १ लाख ८४ हजार ९७७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. मात्र दोन दिवसांत यांपैकी केवळ ८९ हजार २२९ विद्यार्थ्यांनी सायंकाळपर्यंत प्रवेश निश्चित केले होते. त्यामुळे उरलेल्या विद्यार्थ्यांना गुरूवारपर्यंत प्रवेश निश्चित करणे बंधनकारक आहे. नाहीतर उरलेले विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेतून बाहेर पडणार आहेत. परिणामी अकरावी प्रवेशासाठी गुरूवारी महाविद्यालयांच्या प्रांगणात गर्दी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पहिल्या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जावून प्रवेश निश्चित करणे बंधनकारक आहे. अनेक विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्जात नोंदविलेल्या पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेले आहे. तर अनेकांनादुसऱ्या ते पाचव्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेले आहे. मात्र पहिल्या यादीत नाव निश्चित झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. नाही तर संबंधित विद्यार्थी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडेल. प्रवेश घेतल्यानंतर दुसऱ्या यादीत पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश बदलाची संधी आहे. तरी ४ जुलै रोजी दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.