शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

टेकड्यांवर टिप्परने मलबा टाकणे सुरूच

By admin | Updated: August 13, 2014 00:43 IST

दरड कोसळण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. बाळापूर गावाजवळ हाकेच्या अंतरावर महाकाय दगड-मातीची टेकडी तयार झाली आहे. परंतु गावाच्या सुरक्षिततेकरिता बांधण्यात आलेली संरक्षक भिंत केवळ

नंदू परसावार/मोहन भोयर - भंडारादरड कोसळण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. बाळापूर गावाजवळ हाकेच्या अंतरावर महाकाय दगड-मातीची टेकडी तयार झाली आहे. परंतु गावाच्या सुरक्षिततेकरिता बांधण्यात आलेली संरक्षक भिंत केवळ अडीच ते तीन फुटांचीच आहे. दरड कोसळली तर या भिंतीपासून गावाचे संरक्षण कसे होणार, हा प्रश्न कायम असतानाही या टेकडीवर रोज टिप्परने माती व दगड टाकणे सुरूच आहे. परिणामी मलब्यासह दगड खाली घसरत असून शेतात दगड जमा झाले आहेत. अंतर्गत रस्ते चिखलमयगोबरवाही येथून चार कि.मी. अंतरावर बाळापूर मँगनिज खाण आहे. येथील डांबरी रस्त्यांवर जागोजागी पडलेले खड्डे चिखलाने तुडुंब भरले आहेत. खाणीनंतर बाळापूर गावाकडे जाणारा रस्ता निमुळता व धोकादायक आहे. या रस्त्यावरच खुली खाण असून संरक्षक भिंत नाही. खाणीत डोकावून पाहिले तर भोवळ यावे अशी स्थिती आहे. या खाणीजवळ कुणालाही जाता येते. प्रतिबंधित क्षेत्रात सहज जाता येणारी कदाचित ही पहिली खाण असावी.मॉईलने केले अतिक्रमणखाण प्रशासनाने आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करणे सुरू केले आहे. खाणीतील मलबा शिवराज उईके यांच्या रिकाम्या शेतात टाकण्यात येत आहे. परंतु ज्यांची त्या जमिनीवर मालकी आहे त्या शेतकऱ्यांना मोबदला दिलेला नाही. नियमानुसार त्या कुटुंबातील एकाला नोकरी देणे बंधनकारक आहे. परंतु नोकरी अद्याप दिली नाही. यावेळी उईके म्हणाले, आमच्या चार एकर शेतीत खाणीतला मलबा जमा झाला आहे. नोकरीही देत नाही आणि मोबदलाही देत नाही. अशा स्थितीत व्यथा सांगायची कुणाला, असा त्यांचा प्रश्न होता. यासंदर्भात मॉईल व्यवस्थापक यु.आर. सिंग यांना विचारले असता उईके हे आदिवासी प्रवर्गात येत असल्यामुळे त्यांच्या जमिनीची रजिस्ट्री होऊ शकत नाही. त्याकरिता मंत्रालयातून परवानगी आणावी लागते असे त्यांनी सांगितले. रुग्णांची संख्या अधिकबाळापूर परिसरातील भुगर्भात मँगनिज आहे. त्यामुळे विहिरीच्या पाण्यात मँगनिजसह लोहकण, फ्लोरोसिसचे प्रमाण अधिक आहे. या पाण्यामुळे येथे अनेकांना आजाराने ग्रासले आहे. ब्लास्टिंग झाल्यानंतर या परिसरात प्रचंड धूळ असते. श्वासाद्वारे धूलिकण शरीरात जात असल्यामुळे श्वसनाचे विकारही वाढले आहेत.