शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या 'झिगांट' कारभारामुळे जनतेला 'याड' लागायची वेळ - विखे पाटील

By admin | Updated: July 17, 2016 18:10 IST

सैराट सरकारचा कारभार झिंगाट झाला असून जनतेला याड लागायची वेळ आली आहे. त्यामुळं राज्यपाल महोदयांनी दिग्दर्शकाच्या भूमिकेत जावून या चित्रपटाचा कारभार पॅक अप करण्याची गरज निर्माण झाली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ :  सैराट सरकारचा कारभार झिंगाट झाला असून जनतेला याड लागायची वेळ आली आहे. त्यामुळं राज्यपाल महोदयांनी दिग्दर्शकाच्या भूमिकेत जावून या चित्रपटाचा कारभार पॅक अप करण्याची गरज निर्माण झाली आहे. अशी सैराट स्टईल टीका विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी केले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पुर्वसंधेला विरोधी पक्षाने संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यावेळी ते बोलतं होते. 
 
भाजपातील नेत्यांचा आपाआपसातमधील संवाद योग्य नाही, हे सरकार ट्विटरवर चालतंय का? मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे भ्रष्ट्राचाराचा विस्तार होय असं ही ते म्हणाले. 
 
पुढे बोलताना ते म्हणाले,  कर्जतची घटना ही मानवतेला काळिमा फासणारी. निर्भया पेक्षा भयामक कृत्य घडले. एवढी मोठी घटना घडल्यानंतरही मुख्यमंत्र्यांना कुटुंबियांची भेट घेण्यासाठी वेळ मिळू नये. ही गंभीर घटना आहे. मतदारसंघातले मंत्री कारभार घ्यावा की नाही याच चिंतेत आहेत.  हा खटल्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करून फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा. मुख्यमंत्री एकही शब्द याबाबत बोलले नाहीत. हे दुर्दैवचं. 
 
खडसे यांना क्लिन चिट यांत नवल नाही. अनेक निर्णयावर न्यायालयाने सरकारला फटकारले आहे. मंत्र्यामधला विसंवाद चिंताजनक आहे. हे सरकार ट्विटरवरून चालतेय. पक्षाच्या नेत्यांनीच मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला. हे अनाकलनिय. भ्रष्ट अधिकार्यांना संरक्षण अन नेकरदाराच्या वतीनं राज्य सुरूय. त्यामुळं सरकारचं अस्तित्व कुठंही जाणवत नाही. 
 
दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी ठेवलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार